IMPIMP

Women’s T20 Asia Cup | बांगलादेशवर 59 धावांनी मात करत भारताने गाठली उपांत्य फेरी

by nagesh
 Women’s T20 Asia Cup | womens t20 asia cup shafalis all round performance india beat bangladesh by 59 runs to reach the semifinals

बांगलादेश : वृत्तसंस्था – Women’s T20 Asia Cup | आशिया चषकातील 15व्या सामन्यात (Asia Cup) आज भारताने यजमान बांगलादेशला (Bangladesh) नमवून उपांत्य फेरीत धडाक्यात प्रवेश केला आहे. या सामन्यात शफाली वर्माच्या (Shafali Verma) धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने बांगलादेशवर 59 धावांनी मात केली. या सामन्यात शफाली वर्माने (Shafali Verma) अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. याबद्दल शफाली वर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या सामन्यात भारताने बांगलादेश समोर 160 धावांचे लक्ष ठेवले होते. (Women’s T20 Asia Cup)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात अतिशय खराब झाली. यामुळे भारताने पहिल्यापासूनच सामन्यावर पकड निर्माण केली होती. 14 षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या दोन बाद 68 होती. भारताने ठेवलेल्या 160 धावांच्या लक्ष्याच्या बदल्यात बांगलादेशच्या संघाला फक्त 100 धावा करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. या स्पर्धेतील पाच सामन्यांमधला भारताचा हा चौथा विजय असून टीम इंडिया 8 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. (Women’s T20 Asia Cup)

 

भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 159 धावा केल्या.
शफाली वर्मा आणि कर्णधार स्मृती मंधाना (Captain Smriti Mandhana) यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली.
दोघींनी पहिल्या विकेटसाठी 72 चेंडूत 96 धावांची भागीदारी केली.
यानंतर या दोघी अनुक्रमे 55 आणि 47 धावांवर बाद झाल्या.
यानंतर भारताचा डाव गडगडला. ऋचा घोष (Richa Ghosh) 4, किरण नवगिरे (Kiran Navgire) 0 आणि दीप्ती शर्मा (Deepti Sharma) 10 धावा करून झटपट बाद झाल्या मात्र जेमिमाने एक बाजू लावून धरत 24 चेंडूत 35 धावा करत संघाला 150 पार पोहचवले.
अखेरीस, भारताने निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा केल्या.

 

Web Title :- Women’s T20 Asia Cup | womens t20 asia cup shafalis all round performance india beat bangladesh by 59 runs to reach the semifinals

 

हे देखील वाचा :

Narayan Rane | तेंव्हाच तक्रार का केली नाही? नारायण राणेंच्या आरोपांचे छोटा राजनच्या नातेवाईकांकडून खंडन

MS Dhoni | “तुझ्या आयुष्यातील सर्वात अमूल्य गिफ्ट कोणतं?”, धोनीच्या उत्तराने ॲंकरची झाली बोलती बंद

National Games 2022 | महाराष्ट्राच्या राधिका आवटीला तलवारबाजीत मिळाले सुवर्णपदक

 

Related Posts