IMPIMP

Khadakwasla Dam | खडकवासला धरणात 4 दिवसांत तब्बल तीन महिन्यांचा पाणीसाठा; जाणून घ्या प. महाराष्ट्रातील ‘या’ 28 धरणांतील उपयुक्त पाणीसाठा (TMC मध्ये)

by nagesh
Khadakwasla Dam | Khadakwasla dam stores water for three months in 4 days ; know the useful water reserves in these 28 dams in Western Maharashtra (in TMC)

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online): Khadakwasla Dam । मागील काही दिवसापासून पाऊसाने (Rain in Maharashtra) जोर धरला आहे. त्यामुळे नद्या, धरणे तुडुंब भरले आहेत. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पामध्ये (Khadakwasla Dam) गेल्या 4 दिवसामध्ये पाणीसाठ्यात 5 अब्ज घनफुटांनी (TMC) वाढ झालीय. या चार दिवसाच्या पाणी साठ्यामुळे पुणे शहराला जवळजवळ 3 महिने पुरेल इतके पाणी उपलब्ध झाले आहे. खडकवासला धरणात सोमवारी सायंकाळपर्यंत 23 TMC (79 टक्के) पाणीसाठा (Water) उपलब्ध झाला आहे. तर गेल्या वर्षीची तुलना करता जवळपास 13 TMC पाणी जास्त आहे. मागील वर्षी धरणात 9.86 TMC इतकाच पाणीसाठा होत.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

खडकवासला धरणांच्या (Khadakwasla Dam) पाणलोट क्षेत्रात अधिक पावसाने जोर धरला आहे. काल सोमवारी दिवसभरात टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 40 मिलिमीटर तसेच, वरसगाव येथे 23 मिलिमीटर, पानशेतमध्ये 24 मिलिमीटर आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 10 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या दरम्यान, उजनी धरणामध्ये (23 जुलै) रोजी फक्त 0. 91 TMC अर्थात 1.70 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. मागील चार दिवसामध्ये मुसळधार पावसाने उजनी धरणात 18.81 TMC पाणीसाठा झालाय.

धरणांतील सोमवारी सायंकाळपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा (TMC) –

खडकवासला – 1.97 TMC (100 टक्के)

पवना – 6.87 TMC (80.74 टक्के)

टेमघर – 2. 34 TMC (63.08 टक्के)

पानशेत – 9.11 TMC (85.55 टक्के)

वरसगाव – 9.60 TMC (74.87 टक्के)

विसापूर – 0.07 TMC (7.93 टक्के)

कळमोडी – 1.51 TMC (100 टक्के)

चासकमान – 5.91 TMC (77.98 टक्के)

माणिकडोह – 3.27 TMC (32.10 टक्के)

येडगाव – 1.33 TMC (68.20 टक्के)

वडज – 0.58 TMC (49.56 टक्के)

डिंभे – 8. 08 TMC (64.66 टक्के)

घोड – 1.25 TMC (25.73 टक्के)

भामा आसखेड – 6.11 TMC (79.66 टक्के)
नाझरे – 0.07 TMC (12.03 टक्के)

उजनी – 18.81 TMC (35.11 टक्के)

वडिवळे – 0.91 TMC (84.73 टक्के)

आंद्रा – 2.92 TMC (100 टक्के)

कासारसाई – 0.49 TMC (85.62 टक्के)

गुंजवणी – 3.24 TMC (87.77 टक्के)

नीरा देवघर – 10.54 TMC (89.86 टक्के)

भाटघर – 14.95 TMC (63.53 टक्के)

वीर – 9.07 TMC (96.41, टक्के)

 

 

इतर धरणांतील सकाळपर्यंतचा पाणीसाठा –

दूधगंगा – 18.56 TMC (77.40 टक्के)

राधानगरी – 7.63 TMC (98.24 टक्के)

कोयना – 83.31 TMC (83.20 टक्के)

धोम – 8.90 (76.13 टक्के)

वारणा – 24.37 TMC (88.57 टक्के)

 

Web Title : Khadakwasla Dam | Khadakwasla dam stores water for three months in 4 days ; know the useful water reserves in these 28 dams in Western Maharashtra (in TMC)

 

हे देखील वाचा :

Corona Delta Variant | लसीकरणानंतर सुद्धा लोकांना का होतोय डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Raj Kundra Porn Film Case | पॉर्न रॅकेट प्रकरणी ‘शर्लिन -पूनम’ यांना हायकोर्टाचा दिलासा

Coronavirus in India | दिलासादायक ! देशात गेल्या 24 तासात 42363 रुग्ण कोरोनामुक्त; देशातील आतापर्यंत 44 कोटी लोकांचे लसीकरण

 

Related Posts