IMPIMP

Coronavirus in India | दिलासादायक ! देशात गेल्या 24 तासात 42363 रुग्ण कोरोनामुक्त; देशातील आतापर्यंत 44 कोटी लोकांचे लसीकरण

by nagesh
coronavirus in india | india reports 29 689 new corona cases and 415 deaths last 24 hours

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मागील दोन महिन्यात देशात अनेक राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक लोक कोरोनाच्या (Coronavirus in India) जाळ्यात अडकली होती. तसेच अनेक लोकांचा जीव गेला होता. यामुळे लोक भयभीत झाली होती. मात्र आता कोरोनाच्या दुसऱ्या संकटात देशातील नागरिकांना दिलासा मिळणारी बातमी आहे. नव्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होण्याचा आकडा आता अधिक आहे. मागील 24 तासांत 42 हजार 363 रुग्ण कोरोनामुक्त (Coronavirus in India) झालेत. तसेच नव्या बाधितांची संख्या 29 हजार 689 इतके आढळून आलेत. असं केंद्रीय आरोग्य विभागाकडून (Central Health Department) समोर आलं आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मागील 24 तासांत राज्यात 29 हजार 689 नव्या कोरोना रुग्णांची नोंद (Record of corona patients) झालीय. या काळात 415 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यामुळे भारतात कोरोना मृत्यूची संख्या 4 लाख 21 हजार 382 झाली आहे. तसेच मागील 24 तासांत 42 हजार 363 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. भारतात आतापर्यंत एकूण 03 कोटी 06 लाख 21 हजार 469 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील सक्रिय बाधितांची संख्या एकूण 3 लाख 98 हजार 100 इतकी आहे. दरम्यान, आतापर्यंत एकूण 44 कोटी 19 लाख 12 हजार 395 इतक्या लोकांचे लसीकरण (Vaccination) केले आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्रालयाकडून (Central Health Department) सांगण्यात आली आहे.

 

 

महाराष्ट्राला दिलासा –

महाराष्ट्रात कोरोनाची (Corona in Maharashtra) दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे पाहायला
मिळत आहे. सोमवारी महाराष्ट्रात 4 हजार 877 नवीन कोरोना बाधितांची संख्या आढळून आलीय.
तर 11 हजार 77 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. तसेच, 53 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. राज्यात एकूण
60 लाख 46 हजार 106 कोरोनाबाधित रुग्ण बरे झालेत. यामुळे महाराष्ट्रात रिकव्हरी दर (Recovery rate
in Maharashtra) अर्थात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.43 टक्के झाले आहे. तसेच, मृत्यूदर 2. 09 टक्के आहे. या दरम्यान, राज्यातील 3 जिल्ह्यांमध्ये कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजारांपेक्षा जास्त आहे.
यात ठाणे, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समाविष्ट आहे. त्यानंतर मुंबई, सांगली आणि साताऱ्यात 7 हजारांहून जास्त कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

 

Web Title : coronavirus in india | india reports 29 689 new corona cases and 415 deaths last 24 hours

 

हे देखील वाचा :

Pune Rural Police | वेषांतर करुन राहणाऱ्या खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड, 6 महिन्यापासून होता फरार

SBI Alert | टळला मोठा फ्रॉड ! 25 लाखांच्या लॉटरीचा WhatsApp मेसेज आल्यानंतर SBI ने ग्राहकाला असे केले अलर्ट

Dieting | वजन वाढल्यास ‘इथं’ सरकार करून घेते डाएटिंग, न केल्यास भरावा लागतो दंड

 

Related Posts