IMPIMP

Kirit Somaiya Attack Case | किरीट सोमय्या हल्ला प्रकरणात पुणे शहर पोलिस दलातील 2 कर्मचारी निलंबित

by nagesh
 Police Inspector Suspended | 3 Mumbai cops suspended for ‘assaulting, extracting Rs 25,000’ from 2 doctors

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनKirit Somaiya Attack Case | भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्यावर गेल्या आठवड्यात
महापालिकेच्या दारात हल्ला झाला होता. या प्रकरणात (Kirit Somaiya Attack Case) दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित (Police personnel
suspend) करण्यात आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या (Shivajinagar Police Station) दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. CISF च्या अधिकाऱ्यांनी दोन
दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांची भेट घेतली होती. त्यानंतर या दोन कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई
करण्यात आली आहे. दिलीप गोरे (Dilip Gore) आणि सतीश शिंदे (Satish Shinde) असे निलंबन झालेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

 

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर (Kirit Somaiya Attack Case) ते आज पुन्हा पुणे महापालिकेत (Pune Municipal
Corporation) आले. यावेळी त्यांनी पुण्यात येताच पत्रकारांशी संवाद साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवर
(Shivsena) जोरदार निशाणा साधला. याशिवाय महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) देखील त्यांनी टीका केली.

 

Web Title :- Kirit Somaiya Attack Case | Pune Police CP Amitabh Gupta Suspended two police shivaji nagar police station

 

हे देखील वाचा :

Pune Metro | महामेट्रोकडून 82.5 किलोमीटर लांबीचे नवीन 7 मार्ग प्रस्तावित

Multibagger Stock | वर्षभरात 50 पट रिटर्न, ‘या’ पेनी स्टॉकने 1 लाख रुपयांचे केले 50 लाख

Pune Water Supply | पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा रविवारी बंद राहणार

Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

 

Related Posts