IMPIMP

Kishori Pednekar | कोणाच्या कळा, कोणाचे बाळंतपण आणि कोणाच्या मांडीवर बाळ हे सर्वांना कळतं, किशोरी पेडणेकरांची राज ठाकरे आणि भाजपवर टीका

by nagesh
Kishori Pednekar | kishori pednekar was interrogated for two and a half hours by the dadar police

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  अंधेरी पूर्व पोटनिवडणूक (Andheri By Election) बिनविरोध करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS
Chief Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रावरुन मुंबईच्या माजी महापौर
किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राज ठाकरे आणि भाजपवर टीका केली आहे. कोणाच्या कळा, कोणाचे बाळंतपण आणि कोणाच्या
मांडीवर बाळ हे सर्वांना कळत आहे, असे किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज ठाकरे यांनी भाजपला पत्र दिले. कोणाच्या कळा, कोणाचे बाळंतपण आणि कोणाच्या मांडीवर बाळ हे सर्वांना कळत आहे. भाजप आणि ईडी (ED) सरकारला मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर आणि भोंगे लागतात. पत्र लिहिणाऱ्यांना एक विनंती आहे. आपल्या हातून फॉक्सकॉन (Foxconn) जाऊन पॉपकॉर्न आला आहे. त्याबद्दलही एक पत्र लिहावे, असे पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या. यावेळी पेडणेकर यांनी भाजपवर देखील हल्ला चढवला. भाजप फक्त जांबोरी मैदान मिळवून सोहळे साजरे करु शकतो. ते मैदान मिळवू शकतात, मैदान मारू नाही शकत. रिफायनरीच्या मुद्द्यावर शिवसेना (Shivsena) कायम स्थानिकांसोबत राहिली आहे. शिवसेना आपली भूमिका बदलत नाही.

 

पेडणेकर म्हणाल्या, दोन ठिकाणी एकाच वेळी गोष्टी घडल्या. निवडणुकीतून माघार आणि ग्रामपंचायत निवडणूका.
माघार म्हणत असाल, तर पंढरपूर, देगलूर आणि कोल्हापूरात यांनी उमेदवार दिले होते.
तिथे त्यांना बिनविरोध निवडणुका घेता आल्या नाहीत. एका ठिकाणी जिंकले आणि दोन ठिकाणी हरले.
तुम्ही सर्व प्रयत्न करुन पक्षाचे नाव गोठवले, चिन्ह गोठवले. सरपंचाच्या निवडणुकीत फक्त उद्धव ठाकरे
(Uddhav Thackeray) यांच्या नावावर यश मिळाले.
तुमच्याकडे महासत्ता असताना देखील काही होऊ शकले नाही, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Kishori Pednekar | kishori pednekar reaction on mns leader raj thackeray letter

 

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Meeting | मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्यांना नाराज आमदारांना दिवाळीपूर्वी मिळणार महामंडळाचं गिफ्ट! प्रमुख मंत्र्यांची बैठक

State Anthem | सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा! महाराष्ट्राचे ‘राज्यगीत’ म्हणून ‘या’ प्रसिद्ध गीताची निवड

PMC On Pune Rain | रेकॉर्डब्रेक पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाण्याचे लोट; आवश्यक तेथे मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन टाकण्यात येणार – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक

 

Related Posts