IMPIMP

State Anthem | सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा! महाराष्ट्राचे ‘राज्यगीत’ म्हणून ‘या’ प्रसिद्ध गीताची निवड

by nagesh
Sudhir Mungantiwar | The stance of Congress has always been against Shivaji and Hindu gods

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  महाराष्ट्र गीत म्हणून प्रसिद्ध असलेले एक गीत राज्यगीत (State Anthem) म्हणून निवडण्यात आले आहे. या मूळ गीताची लांबी जास्त असल्यामुळे त्याची पहिली दोन कडवी घेऊन त्याला राज्यगीताचा (State Anthem) दर्जा देण्यात येणार आहे. अशी घोषणा राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची महाराष्ट्र राज्यगीत (State Anthem) म्हणून निवड करण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत घोषणा केली. या गीतामधील दोन कडवी घेतली जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली.

 

मुनगंटीवार म्हणाले, गर्जा महाराष्ट्र माझा हे उत्साह वाढवणारे गीत आहे. या गीताच्या शब्दांमध्ये एक उर्जा आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही भावना आहे. हे गीत साडेतीन मिनिटे वाजायचे. त्यामुळे आम्ही अनुमती घेऊन एक ते दोन मिनिटांमध्ये यातील दोन कडवी घेऊन त्याला राज्यगीताचा दर्जा देण्याचा विचार केला आहे.

 

दरम्यान, यासंदर्भात अधिकृत घोषणा आणि तिची अंमलबजावणी कशी होणार? याविषयी अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. तसेच या गीतामधील नेमकी कोणती दोन कडवी राज्यगीतासाठी घेण्यात आली आहेत, याबाबत मुनगंटीवार यांनी माहिती दिलेली नाही. या गीतामधल्या ओळी पुढीलप्रमाणे –

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्रा माझा…

 

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा…

 

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- State Anthem | jai jai maharashtra maza to be maharashtra state song sudhir mungantiwar

 

हे देखील वाचा :

PMC On Pune Rain | रेकॉर्डब्रेक पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाण्याचे लोट; आवश्यक तेथे मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन टाकण्यात येणार – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक

Sanjay Raut | संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांची न्यायालयाबाहेर भेट; खडसेंनी सांगितला भेटीचा किस्सा…

Bhaskar Jadhav | तुम्ही काय म्हशी भादरत होता का?, भास्कर जाधवांचा नारायण राणे आणि त्यांच्या सुपुत्रांवर घणाघात

 

Related Posts