IMPIMP

Kishori Pednekar | सोमय्यांच्या आरोपानंतर पोलिसांनी तातडीने केली शिवसेनेच्या महिला नेत्याची चौकशी, किशोरी पेडणेकर संतप्त, म्हणाल्या…

by nagesh
Kishori Pednekar | former mumbai mayor kishori pednekars mother-in-law died of heart attack

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेनेच्या नेत्या (Shivsena Leader) किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरएमध्ये (Gomata Janata SRA) 6 निवासी गाळे (फ्लॅट) हस्तगत केले आहेत, असा गंभीर आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी केला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सोमय्यांच्या आरोपानंतर तातडीने दादर पोलिसांनी (Mumbai Police) पेडणेकर यांची चौकशी केली. यामुळे खळबळ उडाली आहे. आता यावरून पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्या मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, माझा या सदनिकांशी काहीही संबंध नाही. येथील एका जरी गाळेधारक माझा या सदनिकांशी संबंध आहे, असे म्हणाला तर मी स्वत: या गाळ्यांना टाळे लावीन. एका सामान्य महिलेला नाहक त्रास दिला जात आहे. माझा येथील न्यायव्यवसस्था, पोलीस आणि भारतीय संविधानावर विश्वास आहे.

 

पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या, आज मी टाळे आणि चाव्या सोबत आणल्या आहेत. या ठिकाणी माझा संबंध आहे, असा एक जरी गाळेधारक म्हणाला, तर मी स्वत: त्या गाळ्यांना टाळे मारते आणि आणि माध्यमांकडे चावी देते. या महाराष्ट्रात काय चालले आहे. राज्यात इतर अनेक प्रश्न आहेत. प्रत्येक ठिकाणी घोटाळा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तुम्हीच तेवढे दूध के धुले आहात का?

 

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मी लोखंडे साहेब म्हणजेच सीईओ यांना फोन केला होता. सात दिवसांत गाळ्यासंदर्भात निर्णय द्यावा लागेल, असे मी त्यांना म्हणाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यासाठी संवेदनशील आहेत, असे वाटत आहे. एका सामान्य महिलेला त्रास दिला जात आहे. उद्या मला निवडणूक लढायची असेल तर येथूनच लढणार आहे. या लोकांना मी कोण आहे, याबाबत माहिती आहे. मी कशी वागते याबाबत येथील लोकांना कल्पना आहे.

 

पेडणेकर म्हणाल्या, भाड्याने राहणे हा गुन्हा होता का? दहावेळी बिर्‍हाड बदलणे शक्य नव्हते.
जेव्हा आम्हाला आमच्या जुन्या घराचा ताबा मिळाला, तेव्हा आम्ही आमच्या जुन्या घरात गेलो.
किरीट सोमय्या शिकलेले आहेत. असे विधान करून ते त्यांच्या शिक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
अगोदर बोलायचे आणि नंतर गायब व्हायचे, असे त्यांनी करू नये.
त्यांना या प्रकरणात सत्य परिस्थिती समोर आणून दाखवावी.
माझा न्यायव्यवस्थेवर, पोलीस प्रशासनावर विश्वास आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पेडणेकर यांनी आरोप केला की, तुमच्याकडे केंद्रात सत्ता आहे. राज्यात सत्ता आहे.
सत्ता असली म्हणून काहीही करायचे का? किरीट सोमय्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवतात.
भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नेते भाजपामध्ये सामील झालेले आहेत. मग ते सगळेच नेते स्वच्छ झाले का?
अनिल परब (Anil Parab), संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यानंतर आता मला टार्गेट केले जात आहे.

 

 

Web Title :- Kishori Pednekar | kishori pednekar said ready to face inquiry regarding worli sra scam criticizes kirit somaiya

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | राणा-कडू वादात एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘खोके देण्या-घेण्याचा व्यवहार एकनाथ शिंदेंच्या हातून…’

T20 World Cup 2022 | ‘रमीझ राजा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा’, पाकिस्तानच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूची मागणी

Nitin Gadkari | ‘देशात ई-महामार्ग आणि ई-ट्रक आणण्याचा देखील आमचा संकल्प’ – नितीन गडकरी

 

 

Related Posts