IMPIMP

T20 World Cup 2022 | ‘रमीझ राजा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा’, पाकिस्तानच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूची मागणी

by nagesh
former cricketer sikander bakht says pcb chairman ramiz raja must step down after zimbabwe loss in t20 world cup 2022

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या (Zimbabwe) पाकिस्तानला (Pakistan) एका धावेने पराभव स्वीकारावा लागल्याने पाकिस्तानवर सगळीकडून टीका केली जात आहे. क्रिकेटपटूंपासून ते चाहत्यांपर्यंत बाबर आझमच्या (Babar Azam) कर्णधारपदाच्या टीमला टीकांचा सामना करावा लागत आहे. या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्त (Sikandar Bakht) याने संघ व्यवस्थापन आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (Pakistan Cricket Board) टीका केली आहे. (T20 World Cup 2022)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाला सिकंदर बख्त?

पाकिस्तान संघ आता उपांत्य फेरीत पात्र होण्याची कोणतीही शक्यता नाही.
माजी कसोटीपटू बख्त यांनीही रमीझ राजाने (Ramiz Raja) आता आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे म्हटले आहे.
“जर त्याच्यामध्ये थोडीशीही लाज असेल तर पीसीबी अध्यक्षांनी तात्काळ राजीनामा द्यावा. केवळ अध्यक्षच नाही,
तर मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक (Saklen Mushtaq) आणि फलंदाजी प्रशिक्षक मोहम्मद युसूफ (Mohammad Yusuf) यांनीदेखील आपला पदाचा राजीनामा द्यावा असे ते म्हणाले.

 

1983 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या बख्तने बाबर आझम आणि
मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
बाबर हा अव्वल फलंदाज आहे. हे मला माहीत आहे. पण त्याचे यामध्ये योगदान काय? तुमच्या क्रमवारीशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही असे सिकंदर बख्त म्हणाले आहेत.

 

Web Title :- former cricketer sikander bakht says pcb chairman ramiz raja must step down after zimbabwe loss in t20 world cup 2022

 

हे देखील वाचा :

Nitin Gadkari | ‘देशात ई-महामार्ग आणि ई-ट्रक आणण्याचा देखील आमचा संकल्प’ – नितीन गडकरी

CM Eknath Shinde | ‘मी सर्वांनाच कामाला लावले, काही लोक शेतकऱ्यांच्या बांधावर…’ – मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Solapur Crime | तरुणीने रचला कट, लॉजवर बोलवून तरुणाचे काढले अश्लील फोटो, मागितली खंडणी; पण…

 

Related Posts