IMPIMP

Nana Patole | नोटांवर लक्ष्मी-गणपतीचा फोटो छापण्याच्या केजरीवालांच्या मागणीवर नाना पटोले म्हणाले – ‘केंद्र आणि केजरीवाल मिळून…’

by nagesh
Nana Patole | ambedkar thackeray alliance has nothing to do with maha vikas aghadi nana patole reacts

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – केंद्र सरकार (Central Government) आणि अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) दोघे मिळून
देशाला फसवत आहेत, असा आरोप काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद
केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत मागणी केली की नव्या नोटांवर (Currency) लक्ष्मी (Lakshmi) आणि गणपतीचा (Ganpati) फोटो छापण्यात यावा.
नोटांवर महात्मा गांधींचा (Mahatma Gandhi) फोटो तसाच ठेवत दुसर्‍या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापावा, यावर पटोले (Nana Patole)
यांनी प्रतिक्रिया दिली.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, देशाचा रुपया संपायला आला आहे. ज्या पद्धतीने रुपयांची घसरण सुरू आहे, ती वाचवणे गरजेचे आहे. ही मागणी ज्या व्यक्तीने केली आहे. ती व्यक्ती उच्चशिक्षित आहे. त्यांना या विषयाची जाण आहे. मात्र, मतांच्या राजकारणासाठी या पद्धतीने मागणी करत धार्मिक वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. एकंदरीत केंद्र सरकार आणि केजरीवाल मिळून देशवासियांची फसवणूक करत आहेत.

 

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत मागणी केली की,
नव्या नोटांवर महात्मा गांधींसह लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापावा.
दिवाळीच्या रात्री पूजा करताना आपल्या मनात हा विचार आला आहे. अनेकांशी याबाबत चर्चा झाली आहे.
कोणीही त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि देशाला विकसित करण्यासाठी आपल्याला देवी-देवतांचे आशीर्वाद हवे आहेत.

 

 

Web Title :-  Nana Patole | nana patole reaction on arvind kejariwal demand to print lakshmi and ganpati photo on currency

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘ओल्या दुष्काळाचे पार वाटोळे…’, शिंदे-फडणवीसांच्या राज्याच्या दौऱ्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Former MLA Vinayak Nimhan Passed Away | माजी आमदार विनायक निम्हण यांचे निधन

Jayant Patil | संभाव्य महायुतीवरून राष्ट्रवादीचे भाजपावर टीकास्त्र, जयंत पाटील म्हणाले – टआपण एकमेकांना पुरणार…

Devendra Fadnavis | आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला उत्तर देणे फडणवीसांनी टाळले, एकाच वाक्यात म्हणाले – ‘ते उत्तर देण्यालायक…’

 

Related Posts