IMPIMP

Legislative Council Election | विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या 3 उमेदवारांची घोषणा, ‘या’ जागेचा निर्णय गुलदस्त्यात (व्हिडिओ)

by nagesh
Maharashtra Politics | dilip bhoir resigns from shetkari kamgar paksh joined bjp in the presence of chandrashekhar bawankule

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  Legislative Council Election | विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी (Legislative Council Elections) येत्या 30 जानेवारीला निवडणूक होत आहे. पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने (BJP) आपल्या 3 उमेदवारांच्या नावाची सोमवारी घोषणा केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पत्रकार परिषद घेऊन तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. विधान परिषदेच्या या जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोघांच्या समन्वयाने लाढवल्या (Legislative Council Elections) जाणार आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोकण विधान परिषदेकरीता ज्ञानेश्वर म्हात्रे, पश्चिम विदर्भातून रणजीत पाटील आणि मराठवाड्यातून शिक्षक मतदारसंघासाठी किरण पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. तर नाशिक विधानपरिषद संदर्भात एक दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

 

 

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ आली असताना भाजप आणि काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केलेली नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता तर मतरांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

बच्चू कडूंनी जाहीर केले उमेदवार

पक्ष आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. त्यांनी आगामी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पाचही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला विश्वासात घेतले नसल्याने आपण पाचही मतदारसंघात आपले उमेदवार उभे केल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बच्चू कडूंनी घेतलेल्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत (Legislative Council Elections)
प्रहार जनशक्ती पक्ष (Prahar Jan Shakti Party) विरुद् भाजप-शिंदे गट असा सामना पाहायला मिळणार आहे.
यासंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले, अमरावतीच नाही तर आगामी 30 जानेवारीला होणाऱ्या पदवीधर
(Graduate) आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये (Teacher Constituency Election)
पाचही जागांवर आमचे उमेदवार उभे राहणार आहेत.

 

यासाठी मराठवाड्यातून डॉ. संजय तायडे (Dr. Sanjay Tayde), अमरावतीमधून किरण चौधरी
(Kiran Chaudhary), कोकण विभागातून नरेश शंकर कौंडा (Naresh Shankar Kaunda),
नागपुरातून अतुल रायकर (Atul Raikar) तर नाशिकमधून अ‍ॅड. सुभाष झगडे (Adv. Subhash Jagde)
असे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
यातील एक ते दोन जागा आम्ही कुठल्याही परिस्थिती जिंकू असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

 

 

Web Title :- Legislative Council Election | 3 names announced by bjp for legislative council elections

 

हे देखील वाचा :

Ramdas Athawale | कवाडे गटाच्या समावेशावरून रामदास आठवले नाराज; म्हणाले…

Akshay Kelkar | अक्षय केळकरने विजेते पद पटकावल्यानंतर त्याला मिळाली तब्बल एवढी रक्कम; वाचून व्हाल थक्क

CM Eknath Shinde | …तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरू शकतात ‘या’ ठिकाणी जाणारे पहिलेच मुख्यमंत्री

 

Related Posts