IMPIMP

Ramdas Athawale | कवाडे गटाच्या समावेशावरून रामदास आठवले नाराज; म्हणाले…

by nagesh
Ramdas Athawale | ramdas athawale not happy with eknath shinde decision to alliance with jogendra kawade peoples republican party

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  शिवसेना ठाकरे गट आणि बहुजन विकास आघाडीच्या युतीला शह देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स् रिपब्लिकन पक्षाला सोबत घेण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या याच निर्णयावर भाजपचे मित्रपक्ष असलेले रिपाई चे नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाराज झाले आहेत. तसेच हा निर्णय घेण्याअगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासोबत चर्चा करायला हवी होती. असेही रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्र्यांनी जोगेंद्र कवाडे गटाला समाविष्ट करण्याअगोदर आमच्याशी चर्चा करणे खूप गरजेचे होते. महायुतीत कुणाला घ्यायचे, कुणाला नाही हा महायुतीचा निर्णय असतो. नवीन येणाऱ्यांचे स्वागतच आहे. पण आम्हाला न विचारता याबाबत घोषणा करण्यात आली हे योग्य नाही. अशी भावना रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.

 

अगदी काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई महानगरपालिकेत ठाकरे गट सोडेल तेवढ्या जागेवर लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यावर शिवसेनेच्या शिंदे गटाने देखील जोगेंद्र कवाडे गटाला सोबत घेत, युतीची घोषणा केली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे यांचे कौतुक केले. कवाडे हो अभ्यासू आणि आक्रमक नेते आहेत अशी स्तुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे यांची केली होती. मात्र कवाडे गटाच्या महायुतीत समावेशावरून रामदास आठवले चांगलेच नाराज झाले आहेत.

 

रामदास आठवले हे केंद्रात राज्यमंत्रीपदी विराजमान आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून भाजपसोबत असून त्यांना केंद्रात मंत्रीपद देत भाजपने त्यांचा यथोचित सन्मान देखील केला आहे.
मात्र एका नवीन आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या पक्षाची एन्ट्री महायुतीत झाल्यामुळे आठवले काहीसे अस्वस्थ
झाले आहेत. त्यामुळे त्यांनी याबाबतची नाराजी अखेर बोलून दाखवली आहे.
आता यावर सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार त्यांची कशा प्रकारे समजूत काढते हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अधिकृतरित्या लवकरच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.
त्याच पार्श्वभूमीवर आपला देखील पक्ष मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे
गटाला महायुतीत समाविष्ट करून घेतले होते. आता रामदास आठवले(Ramdas Athawale) यामुळे नाराज
झाले असताना त्यांची समजूत देवेंद्र फडणवीस कसे काढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title :- Ramdas Athawale | ramdas athawale not happy with eknath shinde decision to alliance with jogendra kawade peoples republican party

 

हे देखील वाचा :

Akshay Kelkar | अक्षय केळकरने विजेते पद पटकावल्यानंतर त्याला मिळाली तब्बल एवढी रक्कम; वाचून व्हाल थक्क

CM Eknath Shinde | …तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरू शकतात ‘या’ ठिकाणी जाणारे पहिलेच मुख्यमंत्री

World Boxing Championship | भारताला मोठा धक्का! मेरी कोमची वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधून माघार

BJP MLA Ashish Shelar | ‘नवाब मलिक, दाऊदच्या व्यवहारांना संरक्षण, याकूबची कबर सजवली आता…’ आशिष शेलारांचे मविआवर टीकास्त्र

 

Related Posts