IMPIMP

LIC Saral Pension Yojana | एलआयसीची जबरदस्त योजना ! एकदाच प्रीमियम भरल्यानंतर आयुष्यभर मिळेल पेन्शन, जाणून घ्या

by nagesh
LIC Saral Pension Plan | lic saral pension scheme monthly pension of 12000 rupees on one time premium

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LIC Saral Pension Yojana | ‘भारतीय आयुर्विमा’ची सरल पेन्शन (LIC Saral Pension Yojana) योजना ही एक नॉन-लिंक्ड सिंगल प्रीमियम योजना आहे. या योजनेअंतर्गत, प्रीमियम एकदाच जमा करावा लागतो आणि त्यानंतर आयुष्यभर पॉलिसीधारकाला (LIC Policy) पेन्शन मिळते. सरल पेन्शन योजना जोडीदारासोबतही घेता येते. चला तर या पॉलिसीबद्दल जाणून घ्या.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

पॉलिसीधारकाला दोन पर्याय मिळतील.

पहिला पर्याय.

– एलआयसीच्या या योजनेअंतर्गत, पॉलिसीधारक दोन उपलब्ध पर्यायांपैकी कोणताही एक निवडू शकतात.

– पहिल्या पर्यायामध्ये 100% रिटर्न ऑफ परचेज प्राइस बरोबर लाइफ एन्युटीचा समावेश आहे.

– हे पेन्शन सिंगल लाईफसाठी आहे. म्हणजेच ही पेन्शन कोणत्याही एका व्यक्तीशी जोडली जाईल.

– जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना या योजनेअंतर्गत पेन्शन मिळत राहील.

– पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर, पॉलिसी घेण्यासाठी भरलेला बेस प्रीमियम त्याच्या/तिच्या नॉमिनीला परत केला जाईल.

– या पर्यायामध्ये कट झालेला टॅक्स परत मिळत नाही.

 

 

दुसरा पर्याय.

– दुसरा पर्याय संयुक्त जीवनासाठी आहे.

– या पर्यायामध्ये, पेन्शन पती-पत्नी दोघांनाही जोडलेले आहे.

– जोडीदाराच्या शेवटपर्यंत जो जिवंत राहतो, त्यांना पेन्शन मिळते.

– एखाद्या व्यक्तीला जिवंत असताना जेवढी पेन्शन मिळेल, तेवढीच पेन्शन रक्कम त्यांच्यापैकी एकाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या जोडीदाराला आयुष्यभर मिळते.

– दुसऱ्या पेन्शनधारकानेही जग सोडल्यानंतर, नॉमिनीला तो बेस प्राइस दिला जातो जो त्यांनी पॉलिसी घेताना दिला होता.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

सरल पेन्शन योजनेची खास वैशिष्ट्ये (LIC Saral Pension Yojana)

– या योजनेत पॉलिसी काढताच पेन्शन सुरू होईल.

– पॉलिसीधारकाला दरमहिना, तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा पेन्शन घेण्याचा पर्याय आहे.

– हा प्लॅन ऑफलाइन किंवा ऑनलाइन खरेदी करता येईल.

licindia.in या वेबसाइटवरून पॉलिसी ऑनलाइन खरेदी करता येईल. ,

– योजनेतील न्यूनतम एन्युटी रु. 12,000 प्रतिवर्ष आहे.

– न्यूनतम खरेदी किंमत वार्षिक मोड, निवडलेला पर्याय आणि पॉलिसी घेणाऱ्याचे वय यावर अवलंबून असेल.

– या प्लॅनमध्ये कोणतीही जास्त खरेदी किंमतीला मर्यादा नाही.

– 40 ते 80 वर्षे वयोगटातील लोक ही योजना खरेदी करू शकतात.

– मासिक पेन्शनचा लाभ घेण्यासाठी महिन्यात किमान एक हजार रुपये गुंतवावे लागतील.

– त्रैमासिक पेन्शनसाठी एका महिन्यात किमान ३ हजार गुंतवावे लागतील.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title : LIC Saral Pension Yojana | lic great plan premium will have to be paid only once pension will be available for life

 

हे देखील वाचा :

Sunlight-Immunity | हिवाळ्यात उन्हात शेकल्याने Vitamin D ची कमतरताच नव्हे तर ‘हे’ आजारही दूर होतात; जाणून घ्या

Rohini Khadse | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला

Amit Shah | गुजरातमध्ये 3000 KG ड्रग्ज सापडल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

 

Related Posts