IMPIMP

Lonikand Police Station | पुणे क्राईम न्यूज : 3 कामगारांच्या मृत्यूप्रकरणी वाघोलीतील मंडप साहित्याच्या गोडावुनचा मालक आशिष आग्रवालला अटक

by nagesh
Lonikand Police Station | Pune Crime News : Ashish Agrawal, owner of Mandap Sahitya Godown in Wagholi, arrested in connection with the death of 3 workers

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Lonikand Police Station | वाघोली येथील उबाळेनगरमधील (Ubale Nagar Wagholi) साई सत्यम पार्क (Sai Satyam Park, Khandve Nagar, Wagholi) येथील मंडप साहित्याच्या गोडावुनला आग लागून 3 कामगारांचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आता गोडावुनचा (Warehouse-Godown In Wagholi) मालक आशिष सर्जित आग्रवाल Ashish Sarjit Agarwal (40, रा. प्रेमनगर, बिबवेवाडी, पुणे – Prem Nagar Bibvewadi) याला अटक केली आहे. (Lonikand Police Station)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शुक्रवारी (दि. 5 मे) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास उबाळेनगरमधील साई सत्यम पार्क येथील शुभ सजावट गोडावुनला आग लागली होती (Pune Fire Crime News). गोडावुनचा मालक आशिष आग्रवालने गोडावुनमध्ये कामगारांना रहाण्याची सोय केली होती. त्यासाठी त्याने अग्नीशमन दल, विद्युत विभाग, बांधकाम विभाग आणि पोलिस विभागाची कुठलीही परवानगी घेतली नव्हती (Pune Crime News). त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नव्हती. आगीमध्ये काही क्षणातच गोडावुनमधील साहित्य जळून खाक झाले. गोडावुनमध्ये राहण्यास असलेले कामगार कमल मुकुल बार (25), बिजन मिलन पात्र (24) आणि बी. पात्र (24) यांचा होरपळून मृत्यू झाला. (Lonikand Police Station)

 

आशिष आग्रवालने कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणतीही उपायोजना केली नाही.
निष्काळजीपणा केल्याने 3 कामगारांचा मृत्यू झाला.
लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये आग्रवाल याच्याविरूध्द भादंवि 304 (अ) गुन्हा दाखल करण्यात आला.
बुधवारी (दि. 10 मे) दुपारी लोणीकंद पोलिसांनी आग्रवाल याला अटक केली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र गोडसे (API Ravindra Godse ) करीत आहेत.

 

 

Web Title :-  Lonikand Police Station | Pune Crime News : Ashish Agrawal, owner of Mandap Sahitya Godown in Wagholi, arrested in connection with the death of 3 workers

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार, मंत्र्यांवर अपात्रतेची टांगती तलवार, ते 16 आमदार कोण? संपूर्ण यादी
Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षावर उद्या निकाल, राज्यात हालचालिंना वेग; दोन्ही गटाचे शिलेदार दिल्लीला रवाना

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : ऑनलाइन जुगाराचा नादच खुळा ! गॅम्बलिंगच व्यसनापोटी घरफोडया करणार्‍यास अटक, 21 लाखाचा माल जप्त

 

Related Posts