IMPIMP

Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार, मंत्र्यांवर अपात्रतेची टांगती तलवार, ते 16 आमदार कोण? संपूर्ण यादी

by nagesh
Maharashtra Political Crisis | supreme court verdict tomorrow these 16 mlas in danger zone

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील (Maharashtra Political Crisis) खटल्याबाबत झालेल्या सुनावणीवर उद्या घटनापीठाकडून (Constitution Bench) निकाल दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कोर्ट नेमका काय निकाल देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह बंड केलेल्या आमदारांचं निलंबन (MLA Suspension In Maharashtra) होणार का, कोर्टाकडून घड्याळाचे काटे उलटे फिरवले जाणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे उद्या (गुरुवार) मिळणार आहेत. (Maharashtra Political Crisis)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तसेच 16 बंडखोर आमदारांचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी निलंबन केले होते. परंतु, ही बाब सध्या न्यायप्रविष्ठ आहे. सुप्रीम कोर्टात उद्या येणाऱ्या निकालामुळे निलंबनाची टांगती तलवार असलेल्या एकनाथ शिंदेंसोबतच 16 आमदारांचं काय होणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. (Maharashtra Political Crisis)

 

सुप्रीम कोर्ट 16 आमदारांबाबत स्वत: निर्णय देणार की हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) सुनावणीसाठी पाठवणार हे पहावं लागणार आहे. शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांची विधिमंडळ गटनेतेपदावरुन उचलबांगडी केली. परंतु, त्यानंतर शिंदे यांनी स्वत:ची नियुक्ती केली. मात्र, ही नियुक्ती वैध आहे का? तसेच मुख्य प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची नियुक्ती वैध की भरत गोगावले यांची नियुक्ती वैध? यावर सुप्रीम कोर्ट काय निकाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

एकनाथ शिंदे (Eknath Shinde), संदीपान भुमरे (Sandipan Bhumre), अब्दुल सत्तार (Abdul Sattar),
तानाजी सावंत (Tanaji Sawant), संजय शिरसाट (Sanjay Shirsat), यामिनी जाधव (Yamini Jadhav),
चिमणराव पाटील (Chimanrao Patil), भरत गोगावले (Bharat Gogavle), लता सोनावणे (Lata Sonawane),
रमेश बोरणारे (Ramesh Borwane), प्रकाश सुर्वे (Prakash Surve), बालाजी किणीकर (Balaji Kinikar),
महेश शिंदे (Mahesh Shinde), अनिल बाबर (Anil Babar), संजय रायमुलकर (Sanjay Raimulkar),
बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | supreme court verdict tomorrow these 16 mlas in danger zone

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षावर उद्या निकाल, राज्यात हालचालिंना वेग; दोन्ही गटाचे शिलेदार दिल्लीला रवाना

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : ऑनलाइन जुगाराचा नादच खुळा ! गॅम्बलिंगच व्यसनापोटी घरफोडया करणार्‍यास अटक, 21 लाखाचा माल जप्त

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा ! एमजीएम क्रिकेट अ‍ॅकॅडमी, गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांचा पहिला विजय !!

 

Related Posts