IMPIMP

LPG Cylinder Price Hiked | सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ! घरगुती LPG सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ; जाणून घ्या दर

by nagesh
LPG Cylinder Price Hiked | domestic lpg cylinder price crosses rs 1053 mark with rs 50 hike

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LPG Cylinder Price Hiked | एकीकडे इंधनाच्या दराचा भडका उडाला असून आता घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (Household LPG cylinder) किंमतीत देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत (LPG Cylinder Price Hiked) जवळपास 50 रुपयांनी वाढ झाली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर सरकारी तेल कंपन्यांकडून (Government Oil Companies) एलपीजीच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मागील महिन्यामध्ये 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 3.5 रुपयांनी वाढली होती. त्यामुळे एका सिलिंडरची किंमत 1,003 रुपये झाली होती. याआधी ती 999.50 रुपये होती. सिलिंडर 1 हजार रुपायांच्या पार गेल्यानंतर ही थेट 50 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आल्याने आता गृहिणींच्या बजेटवर याचा परिणाम होणार आहे. त्यानंतर दिल्लीत (Delhi) 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 1053 रुपयांवर पोहोचली आहे. तर मुंबईतही (Mumbai) सिलिंडर 1053 रुपयांवर पोहोचला आहे.

 

दरम्यान, देशभरातील एलपीजी दर 1 हजार रुपयांच्या वर पोहोचले.
22 मार्च रोजी सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी आणि 7 मे रोजी पुन्हा त्याच प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
तसेच, एप्रिल 2021 पासून सिलिंडरच्या किमती 193.5 रुपयांनी वाढल्या आहेत.
सध्याही त्यामध्ये वाढ झाल्याने सामान्यांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहे.

 

Web Title :- LPG Cylinder Price Hiked | domestic lpg cylinder price crosses rs 1053 mark with rs 50 hike

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

Shinde-Fadnavis Government | सरकारचे नाथ ‘एकनाथ’, पण दबदबा ‘देवेंद्रां’चाच?

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

 

Related Posts