IMPIMP

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

by nagesh
Pune Crime | Pune gangster Sharad Mohol Tadipar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | कोथरुड पोलीस ठाणे (Kothrud Police Thane) अभिलेखावरील गँगस्टर शरद हिरामण मोहोळ Gangster Sharad Hiraman Mohol (वय-38 रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरुड) याला पुणे पोलिसांनी (Pune Police) तडीपार (Tadipar) केले आहे. शरद मोहोळ याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून (Pune Crime) सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले आहे. तडपारीचे आदेश पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड (DCP Pournima Gaikwad) यांनी दिले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शरद मोहोळ याने साथीदारांसह पुणे शहर (Pune City), पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) तसेच पुणे ग्रामीण (Pune Rural) मधील वेगवगेळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घातक व जीवघेण्या हत्यारांसह खून (Murder), खूनाचा प्रयत्न (Attempted Murder), गंभीर दुखापत (Serious Injury), खंडणी (Ransom), जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देणे, दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. या भागात त्याची दहशत असून भितीपोटी त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यास कोणी धजावत नव्हते. अखेर पुणे पोलिसांनी पुढाकार घेत गँगस्टर शरद मोहोळ याला तडीपार केले आहे. (Pune Crime)

 

टोळीयुद्धातून गणेश मारणे टोळीतील (Ganesh Marne Gang) पिंटू मारणे (Pintu Marne) याचा खून नीलायम चित्रपटगृह जवळ एका हॉटेलमध्ये शरद मोहोळ आणि साथीदारांनी खून केला होता. हा गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध आरोपीने अपील केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) त्याचा जामीन मंजूर (Bail Granted) केल्याने तो 2021 मध्ये कारागृहातून बाहेर आला होता. कारागृहातून बाहेर येताच काही दिवसात त्याच्यावर पुन्हा दहशत माजविण्याचे गुन्हे दाखल झाले.

 

मोहोळला शहरातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव कोथरुड पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप (Senior Police Inspector Mahendra Jagtap),
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे (Crime Branch Police Inspector Balasaheb Bade)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी भास्कर बुचडे, अजय सावंत, अनिल बारड यांनी तयार केला.
त्यानंतर या मोहोळला शहरातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Pune gangster Sharad Mohol Tadipar

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

RBI – Indian Currency Notes | आता मिळणार नाही कापलेली, फाटलेली, घाणेरडी नोट; RBI ने जारी केली गाईडलाईन, करन्सी नोट चेक करण्यासाठी सांगितले ‘हे’ 11 मानक

 

Related Posts