IMPIMP

Shinde-Fadnavis Government | सरकारचे नाथ ‘एकनाथ’, पण दबदबा ‘देवेंद्रां’चाच?

by nagesh
Shinde Government Expansion | maharashtra politics expansion of the state cabinet portfolio after the winter session

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनShinde-Fadnavis Government | अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची घोषणा झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते. सर्वसामान्य माणूसच नव्हे, तर सर्वच राजकीय पक्षांसाठी हा धक्का होता. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांचे आमदार (MLA) नाराज असल्याची चर्चा सुरू होती. काहींनी असाही अंदाज वर्तवला होता की, जरी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले असले तरी वर्चस्व आणि खरी सूत्रे त्यांच्याच हातात असतील. या गोष्टीचा प्रत्यय शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ताबडतोब आला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शिंदे- फडणवीस (Shinde-Fadnavis Government) यांच्या नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दिसलेल्या एका दृष्यामुळे या चर्चेला बळ मिळाले आहे. दोन दिवसीय विशेष अधिवेशनाची (Special Session) सांगता झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना अचानक फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरील माईक खेचला. यामुळे सर्वजण अवाक झाले. सध्या या दृश्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

संतोष बांगर (Santosh Bangar) हे कोणत्या पक्षातून तुमच्या पक्षात आले, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला.
या प्रश्नावर गोंधळलेल्या शिंदे यांना काय उत्तर द्यावे हे सूचत नव्हते, कुठल्या पक्षामधून काय, ते शिवसेनेतून आलेत ना, असे ते म्हणाले.
इतक्यात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोरून माईक खेचला आणि संतोष बांगर हे शिवसेनेतून खर्‍या शिवसेनेतून आले,
आतापर्यंत ते चुकीच्या गटात होते, असे हजरजबाबी उत्तर दिले.

 

यानंतर फडणवीस यांनी माईक पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंकडे दिला.
या प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी चातुर्याने शिंदेंना अडचणीच्या प्रश्नातून वाट मोकळी करून दिली.
या प्रसंगातून असे संकेत मिळाले की, यापुढे सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी वरचष्मा हा फडणवीसांचा राहील.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shinde-Fadnavis Government | and fadnavis pulled the mic in front of shinden eknath shinde leader of the government but hold of devendra fadnavis a

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

 

Related Posts