IMPIMP

LPG Cylinder Update | जुन्या LPG सिलेंडरच्या बदल्यात घ्या नवीन फायबर ग्लास कम्पोझिट सिलेंडर, किंमत जवळपास सारखीच; जाणून घ्या फायदे?

by nagesh
LPG Commercial Gas Cylinder Price | commercial gas cylinder price hiked by rupees 43

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LPG Cylinder Update | आता लवकरच एलपीजीच्या अवजड गॅस सिलेंडरपासून तुमची सुटका होऊ शकते. आता लोखंडाचा सिलेंडर बदलण्यासाठी फायबर ग्लास कम्पोझिट एलपीजी सिलेंडर (fiberglass composite LPG cylinder Update) लाँच करण्यात आला आहे. या सिलेंडरचे वैशिष्ट्य हे आहे की याचे वजन जुन्या पारंपरिक सिलेंडरपेक्षा 50 टक्के (weights 50 percent less) कमी आहे.

याशिवाय लोकांना तो कमी किमतीत मिळेल आणि जुन्या सिलेंडरच्या बदल्यात तो घेता येईल.
फायबर ग्लासने बनवलेला हा सिलेंडर जुन्या सिलेंडरपेक्षा जास्त सुरक्षित आणि पारदर्शक (safer and more transparent) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

कंपोझिट सिलेंडर केवळ 16 किलोचा

हा सिलेंडर पूर्णपणे पारदर्शक असेल आणि त्याचे वजन केवळ 6 किलो असेल त्याची संरचना दिसण्यास आकर्षक असेल.
यामध्ये अनेक रंगाचे सिलेंडर मिळतील.
गॅस असलेल्या जुन्या सिलेंडरचे वजन 31 किलो असते, तर कंपोझिट सिलेंडर केवळ 16 किलोचा असेल.
कमी वजनामुळे महिला तो सहजपणे उचलू शकतील. फायबरचा असल्याने तो जंगरोधक आहे.

काय असेल किंमत :

10 किलो आणि 5 किलोमध्ये कंपोझिट गॅस सिलेंडर मिळेल 10 किलोच्या गॅस सिलेंडरची किंमत 692 रुपये असेल.
तर 5 किलोसाठी 363 रुपये द्यावे लागतील.
या दोन्हीला जुनेच रेग्युलेटर लावलेले असतील. गॅस किती शिल्लक आहे हे बाहेरून दिसेल
10 किलोच्या सिलेंडरमध्ये जुन्या सिलेंडरच्या तुलनेत सुमारे 4 किलो कमी गॅस मिळेल.

 

28 शहरात मिळणार हा सिलेंडर :

शनिवारी (25 सप्टेंबर) खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांनी ओमेक्स सिटीमध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (ioc) द्वारे आयोजित एका कार्यक्रमात हा सिलेंडर लाँच केला.
पहिल्या टप्प्यात तो दिल्ली, गुरुग्राम, बनारस, फरीदाबाद, प्रयागराज, जयपुर, हैद्राबाद, पाटणा, मैसूर, जालंधर, जमशेदपुर, लुधियाना, रायपुर, रांची, अहमदाबादसह 28 शहरात मिळेल.

इतकी असेल किंमत (new composite LPG cylinder price)

सिलेंडर वितरण कंपनी इण्डेन (Inden) ने माहिती देताना सांगितले की, नवीन कंपोझिट गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांना 10 किलोसाठी 3350 रुपये आणि 5 किलोच्या सिलेंडरसाठी 2150 रुपये द्यावे लागतील. (LPG Cylinder Update)

 

Web Title : LPG Cylinder Update | lpg cylinder update change your old lpg cylinder with composite fiber glass cylinder know its benefits

 

हे देखील वाचा :

Maharashtra Health Dept Exam | आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 167 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune News | दत्तवाडी परिसरातील सोसायट्यांतील पाणी पुरवठा विस्कळीत ! महापालिकेवर मोर्चा काढणार – अभिजित बारवकर

 

Related Posts