IMPIMP

LPG Cylinder Price Today 1 June | व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 135 रुपयांनी स्वस्त, घरगुती सिलेंडरच्या ग्राहकांना दिलासा नाहीच; जाणून घ्या दर

by nagesh
lpg price 1 june 135 rupay sasta hua lpg cylinder becomes cheaper prices reduced by rs 135 from today

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LPG Cylinder Price Today 1 June | एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. आज इंडेन सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त झाला आहे. पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही कपात केली (LPG Cylinder Price Today 1 June) आहे, तर घरगुती एलपीजी सिलेंडरने ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. 14.2 किलोचा घरगुती सिलेंडर स्वस्त किंवा महागही झाला नाही. तो आजही 19 मे रोजीच्या दराने उपलब्ध आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मे महिन्यात बसला होता तडाखा

मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या ग्राहकांना दोनदा धक्का बसला होता. 7 मे रोजी घरगुती सिलेंडरची किंमत प्रथमच 50 रुपयांनी वाढविण्यात आली होती आणि 19 मे रोजीही घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती.

 

7 मे रोजी एलपीजीच्या दरात झालेल्या बदलामुळे घरगुती सिलेंडर 50 रुपयांनी महाग झाला, तर 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर सुमारे 10 रुपयांनी स्वस्त झाला. 19 मे रोजी त्याचे दर आठ रुपयांनी वाढले होते.

 

1 जूनपासून सिलेंडरचे दर

आज म्हणजेच 1 जून रोजी 19 किलोच्या सिलेंडरवर थेट 135 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे.
आता 19 किलोचा सिलेंडर दिल्लीत 2354 ऐवजी 2219 रुपये, कोलकात्यात 2454 ऐवजी 2322,
मुंबईत 2306 ऐवजी 2171.50 आणि चेन्नईमध्ये 2507 ऐवजी 2373 रुपयांना विकला जाईल.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

1 मे रोजी त्यात सुमारे 100 रुपयांची वाढ झाली होती.
त्याच वेळी, मार्चमध्ये दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत केवळ 2012 रुपये होती.
1 एप्रिलला तो 2253 वर आणि 1 मे रोजी 2355 रुपयांवर पोहोचला.

 

Web Title :- lpg price 1 june 135 rupay sasta hua lpg cylinder becomes cheaper prices reduced by rs 135 from today

 

हे देखील वाचा :

Pune Crime | आई-बहिणीला शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा खून, 3 आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

आता विना कटकट काढा PF चे पैसे, मिनिटात थेट जनरेट होईल UAN; EPFO ने दिली ही नवी सुविधा

Pune PMC Election 2022 | महापालिका निवडणूक 2022 ! आरक्षण सोडतीमुळे साधारण 35 जुने चेहेरे मनपाच्या नवीन सभागृहात दिसणार नाहीत; सोडतीनंतर मध्यवर्ती पेठांत भाजप तर उपनगरांत राष्ट्रवादी कॉंग्रेसला फटका बसल्याचे स्पष्ट

 

Related Posts