IMPIMP

Pune Crime | आई-बहिणीला शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा खून, 3 आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

by nagesh
 Pune Crime | The crime branch arrested the criminal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | आई – बहिणाला शिवीगाळ (Abusive) दिल्याच्या रागातून तीन जणांनी एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करुन खून (Murder) केल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्यातील तीन आरोपींना कर्नाटक राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखा युनिट पाचच्या (Crime Branch Unit 5) पथकाने लोणी काळभोर (Loni Kalbhor) परिसरातील टोल नाक्यावर (Toll Naka) ताब्यात घेतले. ही घटना सोमवारी (दि.30) रात्री सातच्या सुमारास फुरसुंगीतील भेकराई बसस्थानकाजवळ (Pune Crime) घडली होती.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

महेश किशोर शिंगाडे Mahesh Kishor Shingade (वय – 26 रा. पापडेवस्ती, भेकराईनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी किरण विठ्ठल धोत्रे Kiran Vitthal Dhotre (वय – 19), अजय सचिन माने Ajay Sachin Mane (वय – 20 दोघेही रा. भेकराईनगर), प्रशांत शंकर हिरेमठ Prashant Shankar Hiremath (वय – 19 रा. ढमाळवाडी, हडपसर, मूळ रा. कर्नाटक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime)

 

मृत महेश शिंगाडे याच्या विरुद्ध 2016 मध्ये खूनाचा गुन्हा दाखल असून तो कारागृहाबाहेर (Prison) आला होता. काही दिवसांपुर्वी महेश आणि आरोपीमध्ये एकमेकांकडे बघण्यावरुन वाद झाले होते. त्याच वादातून महेशने त्यांना आई – बहिणीवरुन शिवीगाळ केली होती. त्यामुळे आरोपींनी सोमवारी (दि.30) फुरसुंगीतील भेकराई बस डेपोशेजारी थांबलेल्या महेश वर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महेशचा मृत्यू झाला. गुन्ह्यातील फरार आरोपींचा तांत्रिक तपास केला असता आरोपी लोणी काळभोर टोलनाक्याजवळ असून ते कर्नाटकात (Karnataka) पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस अंमलदार अकबर शेख (Akbar Sheikh) आणि प्रमोद टिळेकर (Pramod Tillekar) यांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्यांना अटक केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil), सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर (API Krishna Babar), पोलीस अंमलदार अविनाश लोहोटे, अकबर शेख, प्रमोद टिळेकर, रमेश साबळे, दया शेगर, दाऊद सय्यद, दत्तात्रय ठोंबरे, संजयकुमार दळवी यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminals Hadapsar Police Station

 

हे देखील वाचा :

आता विना कटकट काढा PF चे पैसे, मिनिटात थेट जनरेट होईल UAN; EPFO ने दिली ही नवी सुविधा

Pune PMC Election 2022 | महापालिका निवडणूक 2022 ! आरक्षण सोडतीमुळे साधारण 35 जुने चेहेरे मनपाच्या नवीन सभागृहात दिसणार नाहीत; सोडतीनंतर मध्यवर्ती पेठांत भाजप तर उपनगरांत राष्ट्रवादी कॉंग्रेसला फटका बसल्याचे स्पष्ट

How To Protect And Secure Aadhar Card | तुमच्या आधार कार्डाचा गैरवापर होतोय ?; मग ‘या’ पद्धतीने करा सुरक्षित, जाणून घ्या

 

Related Posts