IMPIMP

Maharashtra Cabinet Meeting | मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्यांना नाराज आमदारांना दिवाळीपूर्वी मिळणार महामंडळाचं गिफ्ट! प्रमुख मंत्र्यांची बैठक

by nagesh
Maharashtra Cabinet Meeting | maharashtra cabinet ministers meeting in vidhan bhavan regarding mahamandal distribution

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Cabinet Meeting | पहिल्या विस्तारात मंत्रिमंडळात (Cabinet Expansion) संधी न मिळाल्याने
शिंदे गट तसेच भाजपामधील (BJP) काही आमदार नाराज आहेत. या आमदारांना महामंडळावर (Mahamandal) संधी देऊन त्यांना खुश करण्याचा
शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Government) प्रयत्न आहे. कारण महामंडळाच्या अध्यक्षांना सुद्धा राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. या
संदर्भात राज्य सरकारमधील प्रमुख मंत्र्यांची बैठक (Maharashtra Cabinet Meeting) विधानभवनात सुरू आहे. या बैठकीत महामंडळ वाटपावर
चर्चा सुरू आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant), राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई (State Excise Minister Shambhuraje Desai), वनमंत्री सुधीर मुनंगटीवार (Forest Minister Sudhir Munangtiwar), उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि बंदर विकास मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) उपस्थित आहेत. लवकरच महामंडळांचे वाटप होणार असल्याचे संकेत वरिष्ठ सूत्रांनी दिले आहेत. दरम्यान, महामंडळाचे अध्यक्षपद मिळावे यासाठी भाजप आणि शिंदे गटात (Shinde Group) जोरदार लॉबिंग सुरू आहे. (Maharashtra Cabinet Meeting)

 

शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या विस्तारामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह एकूण 20 मंत्र्यांनी शपथ घेतली. पहिल्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे काही आमदार झाले. यापैकी काही जणांनी आपली नाराजी जाहीरपणे उघड देखील केली आहे. पहिल्या मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या आणि दुसर्‍या मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहणार्‍या कोणत्या नेत्यांना संधी मिळते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला एक महिन्यापेक्षा जास्त काळ लागला होता.
विरोधी पक्षांनी सुरू केलेल्या टीकेनंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला होता.
आता महामंडळ वाटप करताना दोन्ही पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार
असून शिंदे गटाला किती महामंडळे मिळणार हे पाहणे देखील महत्वाचे आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Cabinet Meeting | maharashtra cabinet ministers meeting in vidhan bhavan regarding mahamandal distribution

 

हे देखील वाचा :

State Anthem | सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा! महाराष्ट्राचे ‘राज्यगीत’ म्हणून ‘या’ प्रसिद्ध गीताची निवड

PMC On Pune Rain | रेकॉर्डब्रेक पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाण्याचे लोट; आवश्यक तेथे मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन टाकण्यात येणार – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक

Sanjay Raut | संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांची न्यायालयाबाहेर भेट; खडसेंनी सांगितला भेटीचा किस्सा…

 

Related Posts