IMPIMP

Maharashtra Crime | थर्टी-30 घोटाळा 500 कोटीचा ! 60 ते 70 कोटी मिळाल्याची संतोष राठोडने दिली कबुली

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Bharti Vidyapeeth Police Station - Fraud of crores with the lure of excess return on investment without an investment policy

औरंगाबाद :  सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Crime | जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बोकूड जळगाव, बोकूड जळगाव तांडे, पाटोदे वडगाव, चिंचोली, जांभळी, निलसगाव, जांभळी तांडा, यासह इतर गावांतील शेकडो शेतकऱ्यांना जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. राज्यात हा घोटाळा ३० : ३० गुंतवणूक नावाने ओळखला जात आहे. दरम्यान या घोटाळ्याचा मास्टरमाईंड संतोष उर्फ सचिन नामदेव राठोड आणि त्याचा नातेवाईक यांच्याकडे या गुंतवणुकीचे कोट्यवधी रुपये त्यांच्याकडे जमा झाले असून ५०० कोटीहून अधिक मोठा हा घोटाळा असल्याचे तपासात समोर आले आहे. इतकंच नाही तर यामधून आरोपीने ६० ते ७० कोटी कमावल्याची कबुलीही दिली असल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले. (Maharashtra Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुंडवाडी (ता कन्नड) येथील संतोष राठोड याने ३० एप्रिल २०१३ मध्ये शेतकऱ्यांसाठी लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ५ ते ७ हजार रुपये प्रतिमहिना परतावा देण्याची योजना सुरू केली. सुरुवातीला या योजनेत गुंतवणूक केल्यास पहिले तीन महिने परतावा मिळत नसे. पण चौथ्या महिन्यापासून ठरलेली रक्कम देण्यात येत होती. या योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊ लागली. त्यामुळे संतोषने गाडीचा नंबर ३०३०, मोबाइलच्या क्रमांकाचे शेवटचे अंक ३०३० असेच घेतले. त्याच्या एजंटांनीही स्वत:च्या गाड्या, मोबाइल क्रमांकाच्या शेवटी ३०३० नंबर घेण्यास सुरुवात केल्याने सर्वत्र ही योजना ३० : ३० नावानेच ओळखली जाऊ लागली. लोकांच्या परताव्याचे पैसे देण्यासाठी संतोष आपल्या आलिशान गाड्यांचा ताफा घेऊन जात होता त्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसू लागला. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना डीएमआयसी प्रकल्पाच्या भूसंपादनापोटी लाखो रुपये मिळाले. ते पैसे या योजनेत शेतकऱ्यांनी गुंतवले. त्यामुळे कोट्यवधीपर्यंत याची व्याप्ती गेली. (Maharashtra Crime)

 

 

असा झाला फुगवटा
अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये लाखो रुपये गुंतवले. मार्च एप्रिल २०२१ मध्ये थकीत परतावा देण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी १० लाख गुंतवले त्यांना अडीच लाख रुपये मिळाले. त्यामुळे लोकांचा अधिकच या योजनेवर विश्वास बसला त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळणारा परतावा पुन्हा गुंतवण्यास सुरुवात केली त्यामुळे १० लाखाचा अडीच लाख परतावा मूळ रकमेत जमा केल्यास साडेबारा लाख रुपये झाले अशा प्रकारे हा घोटाळा ५०० कोटींपेक्षा अधिक झाला असल्याचे समोर आले आहे.

 

 

असे फुटले बिंग
योजनेतील परतावा न दिल्याने घोटाळ्याविषयी फेब्रुवारी २०२१ मध्ये वृत्त आले. मात्र संतोषने मार्च-एप्रिल २०२१ मध्ये परतावा दिला. अन यावर पडदा पडला. परतावा इतक्या मोठ्या प्रमाणात दिल्याने पुन्हा पहिल्या पेक्षा जास्त प्रमाणात गुंतवणूक होऊ लागली. पण, यावेळी परतावा काही मिळाला नाही. त्यामुळे परतावा मिळत नसल्याने १६ नोव्हेंबर २०२१ ला बिडकीन पोलीस ठाण्यात ज्योती ढोबळे या महिलेने तक्रार केली. मात्र तक्रार मागे घेतल्याने संतोषला जामीन मिळाला. पण २१ जानेवारी २०२२ दौलत राठोड यांनी ३३ लाख ५० हजार रुपयांना फसविल्याची दुसरी तक्रार झाली अन संतोषच्या यशाची चक्रे उलटी फिरली पोलिसांनी गुन्हा दाखल करून संतोषला बेड्या ठोकल्या.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Maharashtra Crime | thirty thirty scam in aurangabad district santosh rathod

 

हे देखील वाचा :

EPFO | पीएफधारकांसाठी महत्वाची माहिती ! नोकरी सोडली आहे? तर मग हे जाणून घ्या

Moola In Winters | हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने होतील ‘हे’ 5 जबरदस्त फायदे! जाणून घ्या कोणते

Carrot Health Benefits | थंडीच्या हंगामात ‘या’ वेळी करा सुपर फूड गाजरचे सेवन, होतील ‘हे’ जबरदस्त फायदे; जाणून घ्या

 

Related Posts