IMPIMP

Maharashtra Karnataka Border Issue | कर्नाटकमधील भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं देवेंद्र फडणवीसांना जाहीर आवाहन, म्हणाले – ‘सोलापूर, अक्कलकोटही…’

by nagesh
Maharashtra Karnataka Border Issue | karnataka cm basavaraj somappa bommai says devendra fadnavis dreams will never come true

बंगळूरु : वृत्तसंस्था – Maharashtra Karnataka Border Issue | तुमची स्वप्ने कधीही पूर्ण होणार नाहीत, असे म्हणत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Somappa Bommai) यांनी राज्य सरकार आणि पर्यायाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आव्हान दिले आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर बोम्म्ई बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषिक भाग बेळगाव, कारवार आणि निप्पाणी संदर्भात भाष्य केले होते. त्यावर बोम्मई बोलत होते. (Maharashtra Karnataka Border Issue)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

बेळगाव, कारवार आणि निप्पाणी हे मराठी भाषिक भाग आम्ही महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील चाळीस गावांनी देखील ठराव करुन कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला. हा दावा स्थानिक नेत्यांनी आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी खोडला आहे. राज्यातील एकही गाव राज्याबाहेर जाऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. बेळगाव, कारवार, निप्पाणीसह मराठी भाषिकांची गावे मिळविण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे लढा देईल, असा निर्धारही फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत फडणवीसांना उत्तर दिले आहे. (Maharashtra Karnataka Border Issue)

 

बोम्मई म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र – कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर चिथावणीखोर विधान केले आहे.
त्यांचे ते स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. राज्याची जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे भाजप
सरकार सज्ज आहे. कर्नाटकच्या सीमाभागातील कोणतेही गाव देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
याउलट आम्हाला महाराष्ट्रातील अक्कलकोट आणि सोलापूरसारखे कन्नड भाषिक प्रदेश दिले पाहिजेत.
महाराष्ट्र सरकार 2004 पासून सीमाभागातील प्रश्न सर्वोच्च न्यायालयात लढत आहे.
त्यांना त्यात यश मिळाले नाही आणि यापुढे देखील मिळणार नाही. न्यायालयात कायदेशीर लढाईसाठी आम्ही तयार आहोत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Karnataka Border Issue | karnataka cm basavaraj somappa bommai says devendra fadnavis dreams will never come true

 

हे देखील वाचा :

Milind Gawali :‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Pune Crime | राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विदेशी मद्यासह १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime | …म्हणून नात जावयाने केला 74 वर्षाच्या सासूच्या खूनाचा प्रयत्न; कात्रजमधील घटना

 

Related Posts