IMPIMP

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाचे कामकाज आता एक दिवसाआड

by pranjalishirish
maharashtra ministry schedule changed one day work instead of 2 shifts

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईसह राज्यात वाढत्या कोरोनाच्या  Corona पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्रालयातील maharashtra ministry कामकाज 2 शिफ्टमध्ये करण्याचा निणर्य घेतला होता. पण त्यात अडचणी येत असल्याने आता मंत्रालयात  maharashtra ministry दोन शिफ्ट ऐवजी एक दिवसाआड काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल सर्व विभागांना सूचना दिल्या असून मंत्रालयातील प्रत्येक विभागाच्या सचिवांनी कर्मचारी विभागणी करावी, असे आदेश दिले आहेत.

मंत्रालयात maharashtra ministry यापूर्वी 2 शिफ्टमध्ये कामाचे नियोजन केले होते. पण या प्रकारात काम करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे एकदिवसाआड कामाचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयामधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मंत्रालयात कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन करण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व सचिवांना सूचना केल्या होत्या. यात आठवडा, प्रत्येकी 1 दिवसाआड अथवा 3 दिवस अदलाबदली कर्मचारी काम करण्याबाबत नियोजन करावे, अशी सूचना दिली होती. प्रत्येक विभागात कर्मचा-याची गर्दी होणार नाही, सॅनिटाझयर वापर याकडे सचिवांनी लक्ष द्यावे, असे आदेश मुख्य सचिवांनी दिले होते. त्यानुसार, दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो बदलून एकदिवसाआड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Also Read : 

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कामिनी पाटील

मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले – ‘लोकं पंतप्रधान मोदींना लवकरच देव मानतील’

शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेते अन् मंत्र्याची बैठक, ‘या’ 3 महत्वाच्या प्रकरणांचा घेणार आढावा

मधुकर पिचड पडणार एकाएकी? राष्ट्रवादी खेळतोय ‘ही’ खेळी

जळगाव महापालिकेत राजकीय भूकंप, भाजपचे 27 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला

Related Posts