IMPIMP

Maharashtra Municipal Elections | महापालिका निवडणुका आणखी लांबणीवर?; सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली, आता ‘या’ तारखेला ‘सुप्रीम’ सुनावणी

by nagesh
Maharashtra Local Body Election | postponement of local self government elections the hearing will be held in three weeks

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Maharashtra Municipal Elections | स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला (OBC Political
Reservation In Maharashtra) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) स्थगिती दिल्यानंतर निवडणुकीचे अधिकार राज्याने विशेष कायदा पारित करत
स्वतःकडे घेतले आणि त्यानंतर राज्यातल्या 18 पालिकांच्या निवडणूका रखडल्या आहेत. आणि यालाच आता सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं.
मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने 25 एप्रिल रोजी सुनावणी होणार असं जाहीर केलं होतं. दरम्यान आजच्या महापालिकांच्या निवडणुकांबाबत
(Maharashtra Municipal Elections) होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आज (सोमवारी) महापालिकांच्या निवडणुकांबाबत (Maharashtra Municipal Elections) महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार होती. ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता 4 मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागलं असतानाच ऐनवेळ कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे.

 

 

दरम्यान, ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra State Government) निवडणुकांच्या तारखा आणि प्रभाग रचना करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले. सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात वेगवेगळ्या 13 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होऊन निकाल लागेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण ही सुनावणी अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, हा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे.

 

 

Web Title : Maharashtra Municipal Elections | Maharashtra municipal elections supreme court will hear matter of OBC political reservation in maharashtra on 4th may

 

हे देखील वाचा :

PM Kisan Yojana Update | 11 वा हप्ता येण्यापूर्वी पीएम किसान योजनेत झाले ‘हे’ मोठे बदल, लवकर करा अपडेट अन्यथा…

Sanjay Raut on President Rule | ‘राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर महाराष्ट्रासोबत उत्तर प्रदेशमध्येही लावा’ – संजय राऊत

Health Benefits Of Ghee | केसांसाठी तूप अतिशय उपयुक्त घटक; ‘हे’ आहेत त्याचे फायदे, जाणून घ्या

 

Related Posts