IMPIMP

Maharashtra Political News | अजित पवारांच्या भोवती संशयाचे ढग, चार दिवसांनी फडणवीस माध्यमांसमोर आले, मात्र…

by nagesh
Maharashtra Political News | devendra fadnavis came in front of media after speculation about ajit pawar ncp got over

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- Maharashtra Political News | महाराष्ट्रातील राजकारणात मागील काही दिवसांपासून संशयाचे ढग निर्माण झाले
होते. राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हे पक्षात नाराज असल्यामुळे ते आपल्या समर्थक आमदारांसोबत भाजपमध्ये (BJP) जाणार
असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकाराशी संवाद साधताना राजकीय (Maharashtra Political News) वर्तुळात
सुरु असलेल्या चर्चा फेटाळून लावल्या. तसेच आपण राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यात एकिकडे राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या सभोवती संशयाचे ढग दाटलेले असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DyCM Devendra Fadnavis) हे माध्यमांसमोर आले नाहीत. त्यामुळे ते नेमकं आहेत कुठं? अशा चर्चा सुरु झाल्या. फडणवीस यांनी 15 एप्रिलला नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर ते जाहीर कार्य़क्रमात बोलले, मात्र माध्यमांसमोर आले नाहित.

 

आता ते मुंबईत मीडियासमोर (Maharashtra Political News) आले. यावेळी त्यांनी राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाबद्दल (Maharashtra Cabinet Decision) माहिती दिली, ही माहिती दिल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद न साधताच निघून गेले.

 

 

काय म्हणाले फडणवीस?

शेतकऱ्यांना दिवसा वीज (Uninterrupted Power Supply) देण्यासाठी सोलराइजेशन (Solarization) करण्याचा कार्यक्रम आम्ही हातात घेतला आहे. सोलारची वीज दिवसा तर मिळेलच, पण ही वीज 3 रुपये ते 3.30 पैशांपर्यंत आपल्याला मिळणार आहे. आपण जी सबसिडी देत आहोत त्यात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. कोळसा वापरून वीज निर्मितीमध्ये (Electricity Generation) जी पर्यावरणाची हानी होत आहे, ते देखील होणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

 

साखर कारखान्यांच्या प्रस्तावासंदर्भात उपसमिती तयार करण्यात आली आहे. काही तत्व तयार करायला सांगण्यात आलं आहे. कारखान्याच्या अॅसेट व्हॅल्यूच्या किती टक्के लोन काढता येते, याबाबत आरबीआयने नियम केले आहेत. काही निकष ठरवायला सांगितले आहेत. या निकषांमध्ये जे बसतील त्याचा विचार उपसमिती करेल, असं फडणवीस यांनी सांगितलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Political News | devendra fadnavis came in front of media after speculation about ajit pawar ncp got over

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन – वेगवेगळे बहाणे करून चारचाकींमधील बॅगा लंबाविणार्‍या परप्रांतीय टोळीला अटक, 8 गुन्हयांची उकल

Covid 19 Hospitals In Maharashtra | वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन : खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात 25 समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित

Pune Crime News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच : तरूणीच्या कुटंबियांनी लग्नाचे स्थळ नाकारले म्हणून भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, रूपेश वसंत मोरे, बिल्डर अनुज गोयल यांच्याकडे खंडणी मागणार्‍याला अटक, जाणून घ्या प्रकरण (Video)

 

Related Posts