IMPIMP

Sudhir Mungantiwar | ‘मुंबईत इमारती कोसळतात तेव्हा BMC वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो का?’, खारघर दुर्घटनेवर सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण

by nagesh
 Sudhir Mungantiwar | kharghar heatstroke incident kharghar is natural explained by sudhir mungantiwar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन –  खारघरची घटना (Kharghar Heat Stroke) अतिशय दुर्दैवी आहे. मात्र सध्या या घटनेचं राजकारण केलं जात आहे. नैसर्गिक घटनांमध्ये राजकारण करणं टाळलं पाहिजे, असे मत सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केले. तसेच ज्यावेळी मुंबईत इमारती पडतात, त्यावेळी मुंबई महापालिकेवर (BMC) गुन्हे दाखल केले जातात का? असा उलट प्रश्न सुधीर मुंनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला. ते एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यावेळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत 14 जणांचा जीव गेला तर अनेक जणांना उष्माघाताचा त्रास झाला. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर (State Government) टीकेची झोड उठवली आहे. मुलखती दरम्यान सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले की, आप्पासाहेबांनी (Padmashri Dr. Appasaheb Dharmadhikari) दिलेल्या वेळेनुसारच कार्यक्रम घेतला गेला, तसेच कार्यक्रमस्थळी सोयीसुविधांची कोणतीच कमतरता नव्हती, असा दावा त्यांनी केला.

 

राज्य शासन, आयोजक आणि स्वत: सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, काही घटना या नैसर्गिक असतात. मुंबई शहरात इमारती पडतात. त्यावेळी आपण काय मुंबई महापालिकेवर (Brihanmumbai Municipal Corporation) गुन्हे दाखल करत नाही. नैसर्गिक घटनांचं राजकारण टाळलं पाहिजे असं सांगताना इमारत दुर्घटना आणि खारघर दुर्घटनेची मी तुलना करत नसल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

 

40-60 पानांच प्लॅनिंग बुकलेट होतं

कार्यक्रमाच्या वेळेसंदर्भात जर कोणाला सुचवायचं होतं तर त्यांनी सुचवायला पाहीजे होतं. कार्यक्रमाचे नियोजन अतिशय व्यवस्थित केले होते. जवळपास 40-60 पानांचं प्लॅनिंग बुकलेट होतं. अतिशय सूक्ष्म नियोजन करण्यात आलं होतं. उष्णता एवढी वाढेल याची कोणालाच कल्पना नव्हती. लोकांजवळ असलेले पाणी संपलं असताना देखील ते जागेवरुन उठून गेले नाहीत. पाण्याची व्यवस्था करण्यात आली असताना ते पाणी पिण्यासाठी गेले नाहीत. 20-25 लाख लोकांना बसता येईल असा मंडप घालणं अशक्य आहे. अशा प्रकारची दुर्घटना घडेल याचा विचार कोणीच केला नव्हता, असं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तर त्यांनी पुढं यावं

खारघर दुर्घटनेचे ज्या पद्धतीने व्हिडिओ समोर आले आहेत त्यावरून 14 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून
सरकार आकडे लपवत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले,
मुद्दाम खोटा प्रचार करुन आकड्यांबाबत अफवा पसरवली जात आहे. जर कोणाला निश्चित आकडा माहित असेल
तर त्यांनी पुढे यावे, आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Web Title :-  Sudhir Mungantiwar | kharghar heatstroke incident kharghar is natural explained by sudhir mungantiwar

 

हे देखील वाचा :

DG Insignia Award Maharashtra Pune Police | महाराष्ट्र पोलिस दलातील 800 पोलिस अधिकारी-अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह ! पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, CID, SRPF मधील 84 जणांचा समावेश

Pune Mahavitaran News | थकीत वीजबिल भरा सहकार्य करा; पुणे परिमंडलात 6.60 लाखांवर वीजग्राहकांकडे 133 कोटींची थकबाकी

Trinity College Pune | ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड रिसर्च महाविद्यालयामध्ये ड्रोन लॅबचे उद्घाटन ! डॉ. मनोहर चासकर म्हणाले – ‘अध्यापनाला संशोधनाची जोड द्यावी’

 

Related Posts