IMPIMP

Maharashtra Politics | सत्यजीत तांबे यांच्याबाबत बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट करावी; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आव्हान

by nagesh
Maharashtra Politics | bjp will announce stand on satyajeet tambe for nashik mlc election said radhakrishna vikhe patil

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन  Maharashtra Politics | नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency) नाट्यमय घडामोडींनंतर अखेर तांबे पिता-पुत्रांचे निलंबन काँग्रेस पक्षातून केले गेले. त्यावर सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांना पाठिंबा द्यायचा किंवा नाही, यावर लवकरच पक्ष भूमिका जाहीर करणार आहे. असे सुतोवाच राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी यावेळी बोलताना केले. तसेच, बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सत्यजीत तांबे यांच्याबाबत भूमिका स्पष्ट करावी असे थेट आव्हान यावेळी बोलताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाशिक पदवीधर मतदारसंघात सुरूवातीपासूनच वेगाने घडामोडी घडत आहेत. ही निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची होणार अशी शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे. यावर भाजपचे सत्यजीत तांबे यांना समर्थन आहे का? असा प्रश्न राधाकृष्ण विखे-पाटील यांना विचारला असता, त्यावर बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, ‘सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचा की नाही याबद्दल लवकरच पक्ष भूमिका जाहीर करणार आहे. पक्षाच्या भूमिकेप्रमाणे कार्यकर्ते काम करतील.’ असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सत्यजीत तांबे यांच्याबाबत काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट करावी. असे थेट आव्हान यावेळी बोलताना त्यांनी बाळासाहेब थोरात यांना दिले आहे. (Maharashtra Politics)

 

नाशिक येथे आज (दि.२५) कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास राधाकृष्ण विखे-पाटील आले होते. त्यावेळी ते बोलताना म्हणाले, ‘शेतीमाल विकावा लागतो, बाजार समिती साठवणूकीकडे लक्ष दिले पाहिजे. पण व्यवस्था सक्षम झाली नाही, हे दुर्दैव आहे. कृषी पणन यांची सांगड घातली पाहिजे. दोन्ही खाते दोन वेगवेगळ्या लोकांकडे असतात असे त्यांनी म्हटले. तर दुसरीकडे राज्यामध्ये साखर कारखानाचे कर्ज होते. त्यांना कालच्या केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राज्य सरकारच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाच्या भेटीने दिलासा मिळेल. धोरणात बदल होतील. तसेच खुल्या बाजार पेठेत साखर विकता येईल. साखर कारखाना बरोबर प्राथमिक सोसायटीचे काम होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या गौण खनिजाबाबत ते म्हणाले कि, गौण खनिज बाबत पुढील आठवड्यात धोरण घेतले जाईल.’

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मागील काही दिवसांपूर्वी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपवर जोरदार टीका केली होती.
नाना पटोले यांनी भाजपचे नाक कापले. अशी टीका केली होती. त्यावर आज उत्तर देताना विखे-पाटील म्हणाले
की, नाना पटोले यांनी आपल्या नाकाला हात लावून बघायला पाहिजे, राज्यात काँग्रेसची काय अवस्था आहे.
अशी टीका केली.

 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांवर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी वस्तुस्थिती मांडली आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न झाला.
ते सरकार जनतेच्या मनातील नव्हते. आताचे सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही.
असे यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra Politics | bjp will announce stand on satyajeet tambe for nashik mlc election said radhakrishna vikhe patil

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | तब्बल दोन दशकानंतर ‘या’ नेत्याचे शिवसेनेत पुनरागमन; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

Pune News | ‘समाजाप्रती आमच्या जबाबदाऱ्या’ यावर मोती मस्जिदमध्ये सुसंवाद, समर्थ पोलिसांचा सुत्य उपक्रम

 

Related Posts