IMPIMP

Pune News | ‘समाजाप्रती आमच्या जबाबदाऱ्या’ यावर मोती मस्जिदमध्ये सुसंवाद, समर्थ पोलिसांचा सुत्य उपक्रम

by nagesh
Pune News | Harmony in Moti Masjid on 'Our Responsibilities to Society', Smart Police Suta Initiative

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune News | सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी आणि सर्वधर्म समभावनेतेच्या जनजागृतीसाठी मशिदीमध्ये
(Mosque) सर्वधर्मीय यांचा सुसंवाद कार्यक्रम समर्थ पोलीस ठाण्याच्या (Samarth Police Station) वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी
समाजातील सर्व घटकांना बोलावून समाजिक दायित्वाचे मार्गदर्शन करण्यात आले. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार पेठेतील मोती मशिदीत (Moti Masjid) मंगळवारी (दि. 24) सुसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. (Pune News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मोती मस्जिद जमात ट्रस्ट पुणे (Moti Masjid Jamaat Trust Pune), ऑल इंडिया पयाम – ए – इन्सानियत फोरम (All India Payam-e-Insaniyat Forum) यांनी एक गैर-धर्मिक, गैर-राजकीय, एक सामाजिक संस्था आहे. जी शांतता आणि सौदार्याचा संदेश देण्यासाठी देशभर कार्यरत आहे. त्यानुसार समाजाप्रती आमच्या जबाबदाऱ्या या विषयावर मौलाना बिलाल अब्दुल हई नदवी साहब (Maulana Bilal Abdul Hai Nadvi Sahab) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. (Pune News)

 

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सभासद गणेश बिडकर (Ganesh Bidkar), पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल (DCP Sandeep Singh Gill), राहता येथील मौलाना याह्या साहब कासमी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे (Senior Police Inspector Ramesh Sathe), सप्तऋषी गुरुजी (नागेश्वर मंदिर सोमवार पेठ पुणे), पीसीई सोसायटीचे चेअरमन डॉ. पी. ए. इनामदार ,स्नेह संदन इन्स्टिट्यूट डायरेक्टर फादर फिटर डिक्रुझ, गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा पुणे अध्यक्ष भोला सिंग अरोरा, पयाम ए इन्सानियत पुणे अध्यक्ष मौलाना रेझिंग अश्रफ न दवी, लोकसेवा सोशल फाउंडेशन अध्यक्ष सलीम पटेकरी इत्यादी उपस्थितीत होते.

 

यावेळी समाजामध्ये जातीय सलोखा कसा व्यवस्थित राहील, बंधू- प्रेम भाऊ कसा टिकून राहील याबाबत आपापली मते व्यक्त केली.
कार्यक्रमास समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळे, मज्जित ट्रस्टी गैर मुस्लिम समाज इतर सामाजिक संघटना असे 150 ते 200 जनसमुदाय उपस्थित होता.
यावेळी समर्थ पोलीस स्टेशन कडे योग्य तो पोलिस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune News | Harmony in Moti Masjid on ‘Our Responsibilities to Society’, Smart Police Suta Initiative

 

हे देखील वाचा :

Santosh Bangar | प्राचार्यांना मारहाण करणाऱ्या शिंदे गटातील आमदाराचे प्राचार्यांवर गंभीर आरोप; म्हणाले…

Nilesh Rane On Aaditya Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले; म्हणाले…

 

Related Posts