IMPIMP

Maharashtra Politics | बहुमत राष्ट्रवादीला; सूत्रे मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हाती…

by nagesh
Maharashtra Politics | ncp majority in mahanand yet command is in the hands of radhakrishna vikhe

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Maharashtra Politics | महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मर्यादित मुंबई, अर्थात महानंद (Mahanand) सध्या प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात आहे. नुकतीच महानंदची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यात अपवाद वगळता ही निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) स्पष्ट बहुमत असून देखील सरकारी पातळीवरून मदत व्हावी आणि महानंद अडचणीतून बाहेर यावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी महानंदची सर्व सुत्रे राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे सोपविली. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांचे सख्खे मेव्हणे असलेले राजेश परजणे (Rajesh Parjane) यांची महानंदच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. (Maharashtra Politics)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महानंदवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कायमच वर्चस्व राहिले आहे. आता महानंद खूप अडचणीत आहे. दुध संकलन, वितरण कमी झाल्यामुळे कामगारांचे पगार देण्याइतपतही ताकद महानंद मध्ये राहिलेली नाही. त्यामुळे राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातून महानंदला सरकारकडून आर्थिक मदत मिळावी आणि महानंद आर्थिक अडचणीतून बाहेर यावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बहुमत असून देखील महानंदचे पदाधिकारी निवडीची सुत्रे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे दिली. त्यामुळे विखेंनी महानंदच्या अध्यक्षपदी मेव्हण्याची नियुक्ती केली. राजेश परजणे यांना महानंद मध्ये कामाचा अनुभव आहे. (Maharashtra Politics)

 

दरम्यान, विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपने स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी दिली होती. त्यांची थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांच्याशी होती. कोल्हे या मतदारसंघातून निवडूण येण्याची चिन्हे दिसत असतानाच राजेश परजणे यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणुक लढविली. त्याचाच परिणाम म्हणून भाजप उमेदवार स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या ८२२ मतांनी पराभव झाला. पण महानंदच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लावताना या सर्व गोष्टींकडे स्पष्ट दुर्लक्ष केले गेले.

 

त्यामुळे भाजपमध्ये देखील घराणेशाही पहायला मिळत असल्याचा सुर राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.
राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे
(Sujay Vikhe-Patil) नगर दक्षिणचे खासदार आहेत.
या दोन महत्त्वाच्या राजकीय पदांनंतर आता महानंदच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून राजेश परजणे यांच्या
रुपाने तिसरे मोठे राजकीय पद विखेंच्या घरातच गेले आहे. त्यामुळे आता महानंद आर्थिक संकटाच्या बाहेर येईल.
असा विश्वास जाणकार व्यक्त करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Politics | ncp majority in mahanand yet command is in the hands of radhakrishna vikhe

 

हे देखील वाचा :

Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची उडी, टिळक कुटुंबीय उतरल्यास निवडणूक बिनविरोध?

Supriya Sule | सुप्रिया सुळेंचे गोपीचंद पडळकर यांना प्रतिउत्तर; म्हणाल्या – ‘तुम्हाला माझा उद्धटपणा वाटेल, पण,…’

Supriya Sule | ‘मला पंतप्रधान मोदींची काळजी वाटते,’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला

 

Related Posts