IMPIMP

Maharashtra Politics News | महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप?, राष्ट्रवादीनंतर ‘हा’ गट सत्तेत येणार; शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक विधान

by nagesh
Maharashtra Politics News | maharashtra congress will breaks up soon statement by shinde faction leader sanjay shirsat

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड (NCP Rebellion) करुन शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठिंबा दिला. तसेच आपल्याला 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दाव करत राष्ट्रवादीला मोठे खिंडार पाडले आहे. सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर इतर आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. (Maharashtra Politics News) राष्ट्रवादीमध्ये झालेल्या राजकीय भूकंपामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. यानतंर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार असल्याचे सूचक विधान शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Group) नेत्याने केले आहे.

 

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक राजकीय (Maharashtra Politics News) भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे. महाराष्ट्रात आणखी एक गट सत्तेत येईल. काँग्रेसचे (Congress) 16 ते 17 आमदार संपर्कात असल्याचे शिरसाट यांनी म्हटलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

शिरसाट म्हणाले, आणखी एक गट सत्तेत येईल. काँग्रेसचे 16-17 आमदार संपर्कात आहेत, अशी चर्चा आहे. यामध्ये किती तथ्य आहे असा प्रश्न संजय शिरसाट यांना विचारण्यात आला. यावर बोलताना शिरसाट म्हणाले, काँग्रेस पक्ष फुटणार आहे, हे नक्की आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही (Cabinet Expansion) लवकर होणार आहे. त्यामध्ये शिवसेना आणि भाजपाच्या (BJP) आमदारांना मंत्रीपद दिली जातील, तेही तेवढंच सत्य आहे.

काँग्रेस पक्ष फटतोय आणि कधी सत्तेत येणार यासाठी थोडी वाट बघावी लागेल.
मात्र, काँग्रेस फुटणार आहे, हे नक्की आहे. काही काळानंतर काँग्रेसही आमच्याबरोबर दिसेल,
असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं. शिरसाट यांच्या सूचक विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का?
आणि काँग्रेसमधील कोणता गट सत्तेत सामील होणार? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Web Title : Maharashtra Politics News | maharashtra congress will breaks up soon statement
by shinde faction leader sanjay shirsat

Related Posts