IMPIMP

Maharashtra Politics | 50 खोके घेतल्याचा आरोप करणं अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंना महागात पडणार?, शिंदे गटाने घेतला मोठा निर्णय

by nagesh
Maharashtra Politics | otherwise shinde group to file defamation case against ajit pawar supriya sule aditya thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान (Controversial Statement) केले. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण (Maharashtra Politics) चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत सत्तारांनी 24 तासात माफी मागावी असा अल्टीमेटम दिला आणि त्यांची मंत्रिमंडळातून (Cabinet) हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. सत्तार यांच्या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर (Maharashtra Politics) टीका केली. अखेर सत्तार यांनी आपले शब्द मागे घेत माफी मागितली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट- Shivsena (Shinde Group) प्रवक्ते विजय शिवतारे (Spokesperson Vijay Shivtare) यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर 50 खोके घेतल्याचा आरोप करणाऱ्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना इशारा दिला. (Maharashtra Politics)

 

 

सुप्रिया सुळेंचा सल्ला आम्ही ऐकला

 

विजय शिवतारे म्हणाले, काल सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जर माझ्यावर कोणी असे आरोप केले असते तर मी त्याला नोटीस दिली असती. मी त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला असता, मानहानीचा खटला केला असता. सुप्रिया सुळेंचा हा सल्ला आम्ही ऐकलेला आहे. माझी अनेक आमदारांशी (MLA) आणि मुख्यमंत्र्यांशी (CM) चर्चा झाली आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जर इतक्या ताकदीने महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी जे हिंदुत्वाचे नैसर्गिक सरकार बनलेलं आहे, त्याला जर अशाप्रकारे दोष दिले जात असलीत आणि त्याची बदनामी केली जात असेल तर निश्चितपणे 50 आमदारांच्या वतीने प्रत्येकी 50 कोटी असे 2 हजार 500 कोटींचे अब्रुनुकसानीचे दावे, मानहानीचे खटले दाखल करणार आहे. उद्या याची प्रक्रिया सुरु होत असून नोटीसा दिल्या जाणार आहेत.

 

 

जनतेची माफी मागा नाहीतर…

 

अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे खोके आणि बोके म्हणत आहेत, या तिघांनाही नोटिसा पाठवल्या जातील.
एकतर तुम्ही दिशाभूल करणारी वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा नाहीतर मानहानीचा
खटल्याला सामोरे जा. तुम्ही जे 50 खोके घेतल्याचा आरोप करत आहात, त्याचे सर्व पुरावे न्यायालयात
सादर करावेत. निश्चितपणे खरं काय आणि खोटं काय हे स्पष्ट होईल, असं शिवतारे यांनी म्हटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Maharashtra Politics | otherwise shinde group to file defamation case against ajit pawar supriya sule aditya thackeray

 

हे देखील वाचा :

Pune Crime | येरवडा कारागृहांमध्ये कैद्यांमध्ये हाणामारी; हवालदारास मारहाण

Bank Strike | ‘या’ तारखेला देशभरातील बँकांचा संप, ATM सह इतर सेवांवरही परिणाम होऊ शकतो

Maharashtra DCP / Addl SP / SP Transfers | बदली करण्यात आलेल्या 6 पोलीस अधिकाऱ्यांची नव्याने पदस्थापना; DCP नम्रता पाटील, श्वेता खेडकर, तिरुपती काकडे यांचा समावेश

Pune NCP | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागा लढविणार

 

Related Posts