IMPIMP

Maharashtra Politics | मोदींनी नारायण राणेंना चांगलेच खडसावले; ठाकरे गटातील ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

by nagesh
Narayan Rane bjp leader narayan rane mocks raj thackeray on elected mla of mns

सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics | देशाचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या खासगी सचिवाने अनेकांना गंडा घातल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणेंच्या पीएला दम दिला होता, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे. ते आज कणकवली येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी तेथे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना विनायक राऊतांनी नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. (Maharashtra Politics)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना विनायक राऊत म्हणाले, नारायण राणे यांच्या सचिवाने अनेकांना गंडा घातला. ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर गेल्यावर त्यांनी राणे यांची चांगलीच कानउघडणी केली. तसेच आधी या सचिवाला काढून टाका, अन्यथा तुमचे खाते काढून घेतले जाईल, असा सज्जड दम पंतप्रधानांनी राणे यांना दिला असल्याचे देखील यावेळी विनायक राऊत म्हणाले.

 

तसेच काही दिवसांपूर्वी केंद्राच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान केरळच्या एका खासदाराने राणेंना एक प्रश्न विचारला होता तेव्हा देखील राणेंची चांगलीच तारांबळ उडाली होती. केरळच्या खासदाराने राणेंना इंग्रजीत प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी कानाला हेडफोन लावला त्यात त्या प्रश्नाचे हिंदीत भाषांतर झाले. तरीही नारायण राणे यांना हा प्रश्न समजला नाही. राणेंना आधीच मराठी आणि मालवणीही धड बोलता येत नाही. तसेच त्यांना फडणवीस हे नाव देखील धड उच्चारता येत नाही. हिंदी भाषेचा तर पत्ताच नाही. त्यामुळे तेव्हा नारायण राणेंना केरळच्या खासदाराचा प्रश्न समजलाच नाही. ते तामिळनाडू राज्यासंदर्भात बोलत राहिले आणि प्रश्नाला काहीतरी वेगळेच उत्तर दिले. आणि त्यामुळे त्यांची चांगलीच फजिती झाली. तसेच त्या घटनेनंतर नारायण राणे हे लोकसभेची पायरी चढलेले नाहीत, असे देखील यावेळी विनायक राऊत यांनी म्हटले. (Maharashtra Politics)

 

तसेच लोकसभेच्या काराकिर्दीत प्रश्नोत्तराच्या वेळी आपण एकदा तरी उभे राहिलात का?
असा सवाल त्यांनी नारायण राणे यांना विचारला आहे.
जिल्हावासियांना एकदा तरी सांगा एमएसएमई या शब्दाचा फुल फॉर्म, कळलच नाही तर काय सांगणार.
असा टोला देखील विनायक राऊतांनी नारायण राणे यांना लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तसेच त्यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर देखील कठोर शब्दात टीका केली.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची पदवी बोगस असल्याचे म्हणत त्याबाबतचे पुरावे भाजपनेच मिडीयाला
दिले आहेत. असे देखील विनायक राऊत म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra Politics | pm narendra modi slams bjp union minister narayan rane over pa fraud claim by mp vinayak raut

 

हे देखील वाचा :

MP Vinayak Raut | ‘नारायण राणे हैवानाची औलाद, चुलत भावाचा खून केला, नार्को टेस्ट करा’, खा. विनायक राऊतांचा खळबळजनक आरोप

BSNL | नवीन वर्षात ‘बीएसएनएल’ने दिला यूजर्सला धक्का, बंद केले आपले सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान

Jalyukta Shivar Yojna | जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्ट अधिकारी, कंत्राटदारांवर महसुल विभागाची मोठी कारवाई

 

Related Posts