IMPIMP

Maharashtra Primary Schools Reopen | राज्य सरकारकडून पहिलीपासूनच्या शाळा लवकरच सुरू करण्याचे संकेत

by nagesh
Maharashtra Primary Schools Reopen | Indications from the maharashtra government to start Primary Schools

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Primary Schools Reopen | कोरोनाच्या काळात शाळा-काॅलेजला टाळं लागलं होतं. मात्र सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याचे पाहता राज्य सरकारने (Maharashtra Government) नियमांचे पालन करीत शाळा, काॅलेज सुरू करण्यास परवानगी दिली. शहरी भागात 8 ते 12 वी आणि ग्रामीण भागात 5 वी ते 12 वीचे वर्ग सुरू झाले आहेत. आता पहिलीपासूनचे वर्ग सुरू केले जाणार (Maharashtra Primary Schools Reopen) असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी शालेय शिक्षण विभाग (Department of School Education) अनुकूल असल्याचं समजते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

महाराष्ट्रात पहिलीपासूनच्या शाळा (Maharashtra Primary Schools Reopen) सुरू होण्याची शक्यता आहे.
पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभाग अनुकूल असल्याचं समजते.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची मान्यता मिळाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे कळते.
दरम्यान, प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या संदर्भात काल (मंगळवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली.
या बैठकीत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) तसेच शिक्षण विभागाचे सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर शालेय शिक्षण विभाग प्राथमिक शाळा सुरू करण्यास अनुकूल असल्याचं बोललं जात आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

दरम्यान, आगामी पंधरा दिवसामध्ये प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाऊ शकणार आहे.
त्याचबरोबर पुढच्या महिन्यात किंवा जानेवारी महिन्याच्या शेवटी प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे.

 

Web Title : Maharashtra Primary Schools Reopen | Indications from the maharashtra government to start Primary Schools

 

हे देखील वाचा :

ST Worker Strike | दुर्देवी ! संपाच्या तणावातून ST चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; प्रचंड खळबळ

Pune Crime | पुण्यात 20 लाखांच्या कर्जाचे वसुल केले 1 कोटी; परतफेड केल्यानंतरही बायको-मुलीला धंद्याला लावण्याची धमकी; बेकायदा सावकारी करणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

High Court | केवळ दारूचा वास आला याचा अर्थ हा नव्हे की व्यक्ती नशेत आहे – हायकोर्टचा निर्णय

 

Related Posts