IMPIMP

High Court | केवळ दारूचा वास आला याचा अर्थ हा नव्हे की व्यक्ती नशेत आहे – हायकोर्टचा निर्णय

by nagesh
High Court | love does not mean woman is ready for physical relationship kerala high court POCSO act marathi news policenama

तिरूवनंतपुरम : वृत्तसंस्था केरळ हायकोर्ट (High Court) ने एका निर्णयात म्हटले की, केवळ दारूचा वास आल्याने असा अर्थ काढता येऊ शकत नाही की व्यक्ती नशेत आहे. या टिप्पणीसह कोर्टाने एका सरकारी कर्मचार्‍याविरूद्धचा खटला फेटाळला (High Court). न्यायाधीश सोफी थॉमस (Judge Sophie Thomas) यांनी 38 वर्षीय सलीम कुमार (Salim Kumar) यांच्या विरूद्ध दाखल एफआयआर रद्द करत म्हटले की, खाजगी ठिकाणी कुणालाही त्रास न देता दारू पिणे कोणताही गुन्हा नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

10 नोव्हेंबरला जारी करण्यात आलेल्या आपल्या आदेशात हायकोर्टाने म्हटले की, कोणताही उपद्रव न माजवता किंवा त्रास न देता खाजगी ठिकाणावर
दारू पिणे कोणत्याही गुन्ह्यांतर्गत येत नाही. केवळ दारूच्या वासावर हे ठरवता येऊ शकत नाही की, एखाद्या व्यक्तीने तिचे सेवन केले आहे किंवा तो
नशेत आहे. ग्राम सहायक सलीम कुमार विरूद्ध पोलिसांनी हा एफआयआर 2013 मध्ये दाखल केला होता.

पोलिसांनी सलीम कुमार विरूद्ध केरळ पोलीस कायदा कलम 118(ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी म्हटले की, जेव्हा त्याला एका
आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते तेव्हा तो दारूच्या नशेत होता. याविषद्ध सलीम कुमारने न्यायालयात (High
Court) धाव घेतली होती आणि म्हटले होते की, मला पोलिसांनी सायंकाळी सात वाजता एका आरोपीची ओळख पटवण्यासाठी बोलावले होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

कुमारने आपल्या याचिकेत म्हटले होते की, आरोपी माझ्यासाठी अनोळखी होता यासाठी मी त्याला ओळखू शकलो नव्हतो आणि केवळ या आधारावर
पोलिसांनी माझ्याविरूद्ध गुन्हा दाखल केला जातो. केरळ पोलीस कायदा कलम 118(ए) सार्वजनिक आदेश किंवा धोक्याचे गंभीर उल्लंघन करण्यासाठी
दंडाशी संबंधीत आहे. न्यायालयाने म्हटले की, कुमार पोलीस ठाण्यात गेले कारण पोलिसांनी त्यांना बोलावले.

न्यायालयाने म्हटले की, केरळ पोलीस कायद्याच्या या कलमांतर्गत कुणालाही तेव्हा दंड दिला जाऊ शकतो, जेव्हा तो व्यक्ती नशेत एखाद्या सार्वजनिक
ठिकाणी आढळेल किंवा उपद्रव देईल आणि स्वताला सांभाळण्यात अक्षम असेल. सोबतच न्यायालयाने म्हटले की, उपलब्ध रेकॉर्ड हे सांगत नाही की,
याचिकाकर्त्यांला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले होते किंवा रक्ताची तपासणी करण्यात आली होती.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title: High Court | kerala high court says mere smell of alcohol can not be construed to mean that person in intoxicated

 

हे देखील वाचा :

PM Kisan | खुशखबर ! यावेळी शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 2000 ऐवजी जमा होती 4000 रूपये, इथं यादीत तपासून घ्या तुमचं नाव

High Court | परवानगी शिवाय दुसरा विवाह करणारा शिक्षेस पात्र, जाणून घ्या हायकोर्टानं नेमकं काय म्हंटलंय

Pune Crime | पुण्यात सुप्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध पत्नी आणि अभिनेत्री स्नेहा यांच्याकडून कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

 

Related Posts