IMPIMP

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

by nagesh
Maharashtra Rains | heavy rains in upcoming 4-5 days in maharashtra imd alert

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Rains | डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात फारसा पाऊस (Maharashtra Rains) पडत नाही. मात्र, लक्ष्यद्वीपपासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बुधवारी राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर जोरदार पाऊस झाला. डिसेंबर महिन्यातील विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

आतापर्यंतच्या इतिहासात इतका मोठा पाऊस डिसेंबर महिन्यात यापूर्वी पडला नव्हता. पुणे शिवाजीनगर येथे आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ७५.४ मिमी पावसाची नोंद (Pune Rains) झाली आहे. यापूर्वी १३ डिसेंबर २०१४ रोजी एकाच दिवसात सर्वाधिक ५३.१ मिलीमीटर पाऊस बरसला होता. पुणे, मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार (Mumbai Rains) पाऊस झाला आहे.

आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पुणे शिवाजीनगर ७५.४ मिमी, पाषाण १०५.५ मिमी, चिंचवड १०३ मिमी, लवळे ७५ मिमी, मगरपट्टा ६५ मिमी, माळीन ६५ मिमी, तळेगाव ६४ मिमी, दौंड ५२ मिमी, डुडुळगाव ७८ मिमी, वडगावशेरी १२७ मिमी, पुरंदर ७२ मिमी, राजगुरुनगर ६४ मिमी, हवेली ११५ मिमी, भोर ७३ मिमी, आंबेगाव ५५ मिमी, शिरुर २८ मिलीमीटर इतका जोरदार पाऊस पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पडला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

त्याचबरोबर मुंबई ९० मिमी, सातांक्रूझ ९१ मिमी, सांगली ५७ मिमी , कोल्हापूर ६९ मिमी, डहाणु ११४ मिमी, नाशिक ६३ मिमी,
बारामती ५० मिमी, मालेगाव ५५ मिमी, मामोगोवा ६२ मिमी, भायखळा १०० मिमी, जुहू एअरपोर्ट ९३ मिमी,
अहमदनगर २० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 

आजही राज्यातील बहुतांश ठिकाणी आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस (Maharashtra Rains) पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
रात्रभर पाऊस बरसल्यानंतर गुरुवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतली असली तरी दाट धुके आणि बोचरे वारे यामुळे थंडी मोठ्या प्रमाणावर वाजत आहे.त्यामुळे पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी रेनकोट घालायचा की थंडी वाजू नये, म्हणून स्वेटर घालावा, असा संभ्रम लोकांना पडला आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | महिन्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Mumbai Crime | खळबळजनक ! गुंगीचं औषध देऊन पत्नीवर सामूहिक बलात्कार, पतीसह मित्राला अटक

Pune News | बांग्लादेश युद्धात पाकिस्तानवर भारताने मिळविलेल्या विजयाच्या 50 व्या वर्षानिमित्त ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहाचे आयोजन – आबा बागुल

 

Related Posts