IMPIMP

Maharashtra Recruitment | शिंदे-फडणवीसांचा मोदी फॉर्म्युला! येत्या वर्षभरात महाराष्ट्रात 75000 नोकऱ्या देण्याचा सरकारचा दावा

by nagesh
Maharashtra Political News | bjp leader devendra fadnavis reaction on cm eknath shinde upset uday samant

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन देशातील वाढत्या बेकारीवर विरोधक सरकारला घेरत आहेत. त्याचमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
सरकार अस्वस्थ झाले आहे. शनिवारी (दि. 22) रोजी केंद्र सरकारने रोजगार मेळाव्याचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi)
पहिल्या टप्प्यात दहा लाख नोकऱ्यांची घोषणा केली. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देखील पावले टाकली आहेत. महाराष्ट्रात देखील नोकऱ्या
(Maharashtra Recruitment) देण्याचे सरकारचे लक्ष आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात महाराष्ट्रात 75000 हजार (Maharashtra Recruitment)
नोकऱ्या देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या उपक्रमामुळे महाराष्ट्रात देखील आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत चर्चा करुन आगामी काळात महाराष्ट्रातील तरुणांना नोकऱ्या (Maharashtra Recruitment) देण्याचा निर्णय घेतला आहे. 75000 नोकऱ्यांपैकी 18000 पदे रिक्त आहेत. त्यामुळे यावर निर्णय घेऊन येत्या पाच ते सात दिवसांत त्याची जाहिरात निघेल, असे फडणवीस म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना 10 लाख नोकऱ्या देण्याचा उपक्रम उत्कृष्ट असल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी विविध सरकारी विभाग आणि मंत्रालयांना पुढील दीड वर्षांत मिशन मोडवर 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्यास सांगितले होते. तेव्हापासून भाजपशासित सरकार आणि केंद्र सरकारचे (Central Government) विभाग सतत सरकारी नोकऱ्यांसाठी भरती करत आहेत, असे देखील फडणवीस म्हणाले.

 

त्यामुळे आगामी काळात केंद्रात आणि राज्यात तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत. ऐन दिवाळीच्या सणात (Diwali Festival) या आनंदाच्या बातमीने तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लवकरच केंद्रात 10 लाख विविध पदांसांठी पात्रतेनुसार भरत्या होणार आहेत. तर राज्यात देखील भरत्या होणार आहेत. आठवड्याभरापूर्वी देखील महाराष्ट्र शासनाने 11000 पेक्षा जास्त पदसंख्येसाठी पोलीस भरती (Police Recruitment) काढली होती. त्यामुळे येणारे वर्ष बेकारांची संख्या कमी करणारे ठरणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Maharashtra Recruitment | Modi formula of Shinde-Fadnavis! The government claims to provide 75000 jobs in Maharashtra in the coming year

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सिमेंट ऑर्डरचे पैसे मागण्यास गेलेल्या व्यावसायिकाला दाखवला पिस्तुलाचा धाक, निर्मिती डेव्हलपर्सच्या दोघांवर FIR

Kishori Pednekar | भाजपा-शिंदे गटाच्या नेत्यांना किशोरी पेडणेकरांनी सुनावले, म्हणाल्या – ‘ठाकरेंच्या दौर्‍यासाठी तुम्ही घड्याळ लावून…’

Pune Crime | व्यावसायिकाचे अपहरण करुन दीड लाखांची खंडणी उकळणार्‍या दोघांना पुणे पोलिसांकडून अटक

Sharad Pawar | कट्टर आणि निष्ठावान ज्येष्ठ नेत्याचा राष्ट्रवादीला राम राम, लवकरच करणार शिंदे गटात प्रवेश

 

Related Posts