IMPIMP

Kishori Pednekar | भाजपा-शिंदे गटाच्या नेत्यांना किशोरी पेडणेकरांनी सुनावले, म्हणाल्या – ‘ठाकरेंच्या दौर्‍यासाठी तुम्ही घड्याळ लावून…’

by nagesh
Kishori Pednekar | kishori pednekar will be interrogated today in the sra scam case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी औरंगाबाद जिल्ह्यात केली. यावेळी त्यांनी ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करावा आणि शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपयांची मदत करण्याची मागणी केली. दरम्यान, ठाकरेंच्या दौर्‍यामुळे धास्तावलेल्या भाजपा (BJP), शिंदे गटाने (Shinde Group) जोरदार टीका सुरू केली आहे. काल शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant), भाजपाचे प्रवक्ते उपाध्ये (BJP spokesperson Keshav Upadhyay) यांनी टीका केल्यानंतर आता शिंदे गटाचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी ठाकरेंवर टीक केली आहे. या टीकेला जोरदार प्रत्युत्तर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी 24 मिनिटांचा दौरा केला, हे पाहण्यासाठी तुम्ही घड्याळ लावून बसले होते का? असा सवाल किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिंदे गटाचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी 24 मिनिटांचा दुष्काळ पाहणी दौरा केला. तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे आज 15 मिनिटांच्या दुष्काळ पाहणी दौर्‍यावर आले होते, याची मी बातमी पाहिली. मला वाटते की, सर्वसामान्य शेतकर्‍याच्या किंवा कार्यकर्त्याच्या घरी चहा प्यायला गेले तरी 20 मिनिटे लागतात. पण 15 मिनिटांत दुष्काळ पाहणी दौरा होत असेल तर यासारखे आश्चर्य नाही.

 

या टीकेला प्रत्युत्तर देताना किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांनी 24 मिनिटांचा दौरा केला, हे पाहण्यासाठी तुम्ही घड्याळ लावून बसले होते का? आमचा दौरा 24 मिनिटांचा असो, वा 1 तासाचा असो, आम्हाला यातून काहीही साध्य करायचे नाही. आम्ही लोकांबरोबर आहोत, हेच आम्हाला सांगायचे आहे, बाकी आम्हाला काहीच साध्य करायचे नाही. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचा दौरा केला.

 

पेडणेकर म्हणाल्या, आम्ही साध्य केले, आम्ही साध्य केले, असे तुम्ही वारंवार म्हणत आहात.
पण तुम्ही कसे साध्य केले? काय साध्य केले? हे सगळे लोकांना माहीत आहे.
त्यामुळे आम्हाला काहीही साध्य करायची गरज नाही, लोक आमच्यासोबत आहेत.
वाचाळवीर तानाजी सावंतांसारखे घरापासून कार्यालय आणि कार्यालयापासून घर, असे दौरे तरी आम्ही केले नाहीत.

 

Web Title :- Kishori Pednekar | uddhav thackeray visit to aurangabad kishori pednekar reaction abdul sattar tanaji sawant

 

हे देखील वाचा :

Pune Crime | व्यावसायिकाचे अपहरण करुन दीड लाखांची खंडणी उकळणार्‍या दोघांना पुणे पोलिसांकडून अटक

Sharad Pawar | कट्टर आणि निष्ठावान ज्येष्ठ नेत्याचा राष्ट्रवादीला राम राम, लवकरच करणार शिंदे गटात प्रवेश

Shivsena | दिवाळीच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेने फोडला फटाका, शिंदे सरकारला इशारा देत म्हटले…तर खुर्चीखाली धमाका

 

Related Posts