IMPIMP

Maharashtra Temperature | राज्यात धुक्यासह थंडीचा कडाका ! जळगावात तापमान 7 अंशावर, पुण्यात पारा घसरला

by nagesh
Pune Temperature | Lowest minimum temperature of 'this' season in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Temperature | फेब्रुवारी महिना सुरु झाल्यानंतर देशात उन्हाळ्याची (Summer) चाहूल लागायला सुरुवात होते. मात्र यंदा फेब्रुवारी (February) महिन्यात किमान तापमान (Maharashtra Temperature) सरासरी पेक्षा कमीच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आली आहे. त्यामुळे आणखी एक महिनाभर राज्यात थंडी (Cold) कायम राहण्याची शक्यता आहे. अशात मागील काही दिवसांपासून राज्यात धुक्यासह थंडीचा कडाका वाढतच चालला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुढील काही दिवसांत उत्तर भारतात किमान तापमानाचा (Minimum Temperature) पारा काही अंशी घसरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
तसेच उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) आणि मराठवाड्यात (Marathwada) अनेक ठिकाणी तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
आज सकाळी जळगाव (Jalgaon) येथे सर्वात कमी तापमानाची (Maharashtra Temperature) नोंद झाली आहे.
जळगावमध्ये 7 अंश सेल्सिअस (Degrees Celsius) तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

 

 

राज्यातील प्रमुख शहरातील तापमान
नाशिक 9.5, पुणे 9.9, मालेगाव 11.4, बारामती 11.4, सोलापूर 12.6, सातारा 13, कोल्हापूर 17, महाबळेश्वर 14.4, अहमदनगर 8.8, उस्मानाबाद 12.1, जेऊर 11, माथेरान 14.8, सांगली 15.3, चिखलठाणा 10.8, नांदेड 12.2, परभणी 14.5, कुलाबा 17.5, सांताक्रूझ 14.8,
ठाणे 18, रत्नागिरी 16.5 आणि नागपूर 10.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

फेब्रुवारीत तापमानाचा पारा खालीच राहणार
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात देशातील बहुतांशी ठिकाणी किमान तापमान सरासरी तापमानाच्या खालीच राहण्याची शक्यता आहे.
केवळ पूर्वेत्तर भागातील पूर्वेकडील भागात, दक्षिण भारतातील काही भाग आणि मध्य भारतातील दक्षिणपूर्व भागात किमान तापमान सामान्य किंवा सामान्य पेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Maharashtra Temperature | Cold snap with fog in the state Temperature drops to 7 degrees in Jalgaon mercury drops in Pune

 

हे देखील वाचा :

Tata Group TTML | टाटा ग्रुपच्या ‘या’ शेयरमध्ये पैसा लावणार्‍यांचे मोठे नुकसान, 41.50 रुपयांपर्यंत येईल टीटीएमएलचा भाव

NCP Prashant Jagtap | भ्रमनिरास करणारा दिशाहिन अर्थसंकल्प, राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

Pune Crime | 300 कोटीची क्रिप्टो करन्सी व पैशांच्या हव्यासापोटी अपहरण; खंडणी मागणाऱ्या मुख्य सुत्रधार पोलिसासह 8 जणांना अटक

 

Related Posts