IMPIMP

Maharashtra Temperature | डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र गारठणार, जाणून घ्या पुण्यातील स्थिती

by nagesh
Maharashtra Weather | upcoming two days maharashtra cold wave for 2 days says imd

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन मागील काही दिवसांपासून देशातील हवामानात (Maharashtra Temperature) वेगाने बदल होत आहेत. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी अद्याप राज्यात थंडीला (Cold) सुरुवात झालेली नाही. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रासह (Maharashtra Temperature) दक्षिण-पूर्व भारतात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने (Heavy rain) हजेरी लावली. त्यामुळे ऐन हिवाळ्याच्या दिवसात (Winter Days) अवकाळी पाऊस पडल्याने राज्यात अपेक्षित थंडी पडली नाही.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

मात्र आता उत्तर भारतात किमान तापमानात (Maharashtra Temperature) विक्रमी नोंद झाली आहे. गुरुवारी (दि.9) दिल्लीतील लोधी रोड (Lodhi
Road in Delhi) परिसरात विक्रमी 8.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. यावर्षीचं सर्वात कमी तापमान म्हणून याची नोंद करण्यात आली आहे. खरंतर सध्या हिमालयातून दक्षिण दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग वाढल्याने राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात थंडी वाढली आहे.

महाराष्ट्रात थंडी वाढणार
पुढील काही दिवसांत किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी उत्तर भारतातील किमान तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत घट होऊ शकते, अशी माहिती हवामान विभागाने (IMD) दिली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात देखील जाणवणार आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. त्यामुळे येत्या काळात काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

 

पुण्यात कोरडे हवामान
विकेंडनंतर सोमवार आणि मंगळवारी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग दोन जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर पुण्यात पुढील पाच दिवस कोरडं हवामान (Dry weather) राहणार आहे. पुण्यातील हवेली येथे सर्वात कमी 14.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुण्यात अन्य ठिकाणी 15 ते 18 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

 

Web Title :- Maharashtra Temperature | temperature in maharashtra know weather in pune

 

हे देखील वाचा :

Nominee | व्यक्तीच्या मृत्यूनंतर काय होते बँकेत ठेवलेल्या पैशांचे? कोण होतो त्यांचा मालक

Ajit Pawar | कोरोनाबाबत निर्बंध, बुस्टर डोस आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात अजित पवारांचं महत्वाचं विधान; म्हणाले…

Privatization of Airports | आगामी 5 वर्षात नागपुरसह आणखी 25 विमानतळांचे खासगीकरण, ‘ही’ आहे पूर्ण यादी

 

Related Posts