IMPIMP

Nominee | व्यक्तीच्या मृत्यूनंतर काय होते बँकेत ठेवलेल्या पैशांचे? कोण होतो त्यांचा मालक

by nagesh
Nominee | how to withdraw money from the account of a deceased person

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Nominee | व्यक्ती मृत झाल्यानंतर तिच्या खात्यातून डेबिट कार्ड किंवा इतर माध्यमातून पैसे काढणे दंडणीय गुन्हा आहे. बचत खात्यात नॉमिनीची नोंद नसताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर काय होते? एखाद्या मृत व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढण्याची एक कायदेशीर प्रक्रिया आहे. अशाच प्रकारच्या तीन स्थिती असू शकतात, ज्यामध्ये पैसे काढता येऊ शकतात, त्या जाणून घेवूयात. (Nominee)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

 

मृत व्यक्तीसोबत जॉईंट अकाऊंट
जर एखाद्या व्यक्तीचे मरणार्‍या व्यक्तीसोबत जॉईंट अकाऊंट (Joint Account) असेल तर सध्याची रक्कम दूसरी व्यक्ती काढू शकते. कारण सर्व पैसे जॉईंट होल्डरला हस्तांतरित केले जातात. अशा स्थितीत मृत व्यक्तीचे नाव अकाऊंटमधून काढून टाकण्यासाठी त्याच्या मृत्यू दाखल्याची एक कॉपी ब्रँचमध्ये जमा करावी लागेल. यानंतर बँक मृत व्यक्तीचे नाव जॉईंट अकाऊंटमधून काढून टाकेल.

 

नॉमिनी (Nominee) असेल तर?
जर कुणी नॉमिनी असेल तर बँक खात्यात उपलब्ध पैसे नॉमिनी व्यक्तीला देते. पैसे सोपवण्यापूर्वी बँक नामांकन (Nomination) आणि सोबतच मृत्यूच्या दाखल्याची मूळ प्रत तपासते. जर काही वादग्रस्त असेल पैसे मिळण्यास उशीर होऊ शकतो.

जर नॉमिनी नसेल तर?
खात्यास कुणीही नॉमिनी नसेल तर पैसे मिळवण्यासाठी इच्छूक व्यक्तीला एक दिर्घ प्रक्रियेतून जावे लागेल. तिला इच्छापत्र (WILL) किंवा उत्तराधिकार प्रमाणपत्र द्यावे लागेल, ज्यातून हे सिद्ध होईल की मृत व्यक्तीचे पैसे त्यास मिळावेत.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

 

जर कुणी क्लेम केला नाही तर?
बँक खाते आणि पैशांवर कुणी क्लेम केला नाही तर बँक असे खाते निष्क्रिय खात्यात बदलू शकते.
कुणीही व्यक्तीने दावा केल्यास बँक उर्वरित रक्कम कायदेशीर वारसाला देऊ शकते.

 

Web Title :- Nominee | how to withdraw money from the account of a deceased person

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | कोरोनाबाबत निर्बंध, बुस्टर डोस आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात अजित पवारांचं महत्वाचं विधान; म्हणाले…

Privatization of Airports | आगामी 5 वर्षात नागपुरसह आणखी 25 विमानतळांचे खासगीकरण, ‘ही’ आहे पूर्ण यादी

आपले Aadhaar Card मिनिटात करा ITR सोबत लिंक, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

 

Related Posts