IMPIMP

Maharashtra Weather | अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात पुढील काही तासात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

by nagesh
Rain in Maharashtra | rain updates monsoon return rain may continue for next 4 days in maharashtra

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Weather | दक्षिण भारत आणि मध्य भारतात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने राज्यात सध्या अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पाऊस पडत आहे. हवामान विभागाने आज सकाळी इशारा जारी केला आहे. त्यानुसार अहमदनगर (Ahmednagar), बीड (Beed), सोलापूर (Solapur), उस्मानाबाद (Osmanabad), लातूर (Latur) जिल्ह्यात पुढील ३ ते ४ तासात विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, असा इशारा देण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी, श्रीरामपूर येथे तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, जेऊर येथे पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather)

 

अवकाळी येणार्‍या पावसाच्या काळात विजांचा कडकडाट होत असतो.
अशा वेळी अनेकदा वीज पडून काही जणांना आपले प्राण गमवावे लागतात.
आकाशात वीजा चमकत असताना उंच झाडाखाली थांबू नये. पक्क्या स्लॅबच्या छताखाली थांबावे.

 

राज्यात गुरुवारी धुळे, नंदुरबाऱ, जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गुरुवारी व शुक्रवारी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

Web Title :- Maharashtra Weather | Chance of rain with thunderstorm in next few hours in Ahmednagar Beed Solapur Osmanabad Latur districts

 

हे देखील वाचा :

Police Inspector Transfer Pune | गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात आणि खंडणी विरोधी पथक -1 च्या ‘प्रभारी’पदी व. पो. निरीक्षकांच्या नियुक्त्या

Pune Crime | पुण्यात चोर पोलिसात थरार ! ATM फोडणार्‍या चोरट्यांकडून पोलिसांवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न, दोघांना अटक; हडपसरमधील पहाटेची घटना

Pune Crime | प्रकल्पाच्या आराखड्यात परस्पर बदल करून फसवणूक ! अशोक भंडारी, राजन रायसोनी, सिध्दांत कोठारी, अमान उर्फ अरमान कोठारीसह 6 जणांविरूध्द 1.45 कोटींच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल

 

Related Posts