IMPIMP

Pune Crime | पुण्यात चोर पोलिसात थरार ! ATM फोडणार्‍या चोरट्यांकडून पोलिसांवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न, दोघांना अटक; हडपसरमधील पहाटेची घटना

by nagesh
Pune Police | Woman safely home after 12 years from abroad, commendable performance of Pune Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | चोरटे एटीएम (ATM Center) फोडत असल्याची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्यातील (Hadapsar Police Station) पोलीस मार्शल (Beat Marshall Police) तातडीने तेथे पोहचले. चोरट्याने त्यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. तरीही पोलिसांनी मोठ्या धाडसाने दोघा चोरट्यांना जेरबंद केले. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रशांत अभिमान कसबे (वय १९, रा. चव्हाणनगर, धनकवडी), तेजस राजु जाधव (वय १९, रा. आंबेगाव पठार) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना हडपसरमधील आकाशवाणी (Akashwani Hadapsar Pune) येथील आयडीबीआयच्या एटीएम सेंटरमध्ये (IDBI Bank ATM) बुधवारी पहाटे ३ वाजून २१ मिनिटांनी घडली. (Pune Crime)

 

याप्रकरणी पोलीस अंमलदार (Pune City Police) श्याम पांडुरंगराव येदले (वय ३५) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. आयडीबीआय बँकेच्या सर्व एटीएम सेंटरच्या सुरक्षेची जबाबदारी एका कंपनीवर सोपविण्यात आली आहे. एटीएम सेंटरमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे परीक्षण कंपनीच्या नियंत्रण कक्षातून (Pune City Police Control Room) केले जाते. हडपसर येथील आकाशवाणी जवळ असलेल्या आयडीबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दोघे चोरटे शिरले. त्यांनी मशीन फोडून जबरी चोरीचा प्रयत्न सुरु केला. नियंत्रण कक्षातील कर्मचार्‍यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने हडपसर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही माहिती मिळताच मार्शल श्याम येदले व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले.
तेव्हा एटीएम सेंटरमध्ये दोघे जण होते.
पोलिसांना पाहून प्रशांत कसबे याने त्याच्याकडील कोयता घेऊन श्याम येदले यांच्या अंगावर धावून आला.
तेजस जाधव याने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
असे असतानाही त्यांनी दोघांना धरुन ठेवले.
पोलिसांची जादा कुमक तातडीने तेथे पोहचली. त्यांनी दोघा चोरट्यांना पकडले.
पोलीस उपनिरीक्षक दिंगबर सोनटक्के (PSI Dingbar Sontakke) अधिक तपास करीत आहे.

 

Web Title :- Pune Crime | Thieves vs Pune police Beat Marshall Attempt to stab police two arrested Morning incident in Hadapsar

 

हे देखील वाचा :

Pune Crime | प्रकल्पाच्या आराखड्यात परस्पर बदल करून फसवणूक ! अशोक भंडारी, राजन रायसोनी, सिध्दांत कोठारी, अमान उर्फ अरमान कोठारीसह 6 जणांविरूध्द 1.45 कोटींच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल

Suhana Khan’s Latest Viral Video | शाह रूख खानची मुलगी सुहानाचा ‘हा’ बोल्ड व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल

Pune Crime | पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता

 

Related Posts