IMPIMP

Manikchand Oxyrich Packaged Water | माणिकचंद ऑक्सिरिच आता नव्या रुपात ! पाण्याची ग़ुणवत्ता कायम ठेवून बॉटल नव्या लाल रंगात

by sachinsitapure
Manikchand Oxyrich Packaged Water

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – पिण्याच्या पाण्याच्या उच्च गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेला नामांकीत माणिकचंद ऑक्सिरीच पॅकेज वॉटर (Manikchand Oxyrich Packaged Water) आता वेगळ्या रुपात समोर आला आहे. निळ्या रंगाची लेबल असलेल्या कंपनीच्या पाण्याची बाटली आता लाल आणि पांढर्‍या रंगातील अधिक आकर्षक स्वरुपात ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. या नव्या बदलांमुळे माणिकचंद ऑक्सिरीचप्रमाणे पाण्याच्या बाटलीची कॉपी करून ग्राहकांची फसवणूक करणार्‍या कंपन्यांना आळा बसणार आहे. (Manikchand Oxyrich Packaged Water)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

भारतातील नामांकित पॅकेजड् वॉटरमध्ये माणिकचंद ऑक्सिरिज हा आघाडीवर असलेला ब्रॅन्ड आहे. 2002 पासून ग्राहकांना गुणवत्ता आणि ऑक्सीजन युक्त पाण्याचा पुरवठा करणार्‍या या कंपनीच्या बाटलीचा लेबल हा निळ्या रंगाचा होता. मात्र माणिकचंद ऑक्सिरिच कंपनीची बाजारात असलेली ओळख,प्रसिद्धी व गुणवत्ता लक्षात घेऊन 500 पेक्षा जास्त लोकल कंपन्यांनी ऑक्सिरिच प्रमाणेच नामसांध्यर्म आणि बाटलीला लेबल लावून त्यांचे ब्रॅन्ड बाजारात आणले होते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत होती.

 

ही बाब लक्षात घेऊन ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माणिकचंद ऑक्सिरिच पाण्याच्या बाटलीला असलेले निळ्या रंगाचे लेबल बदलून त्याऐवजी आता लाल व पांढर्‍या रंगाच्या लेबलमध्ये नव्या स्वरुपात ग्राहकांसमोर आणले आहे. त्यामुळे ग्राहकांना खरी ऑक्सिरिचची बाटली ओळखणे सहज शक्य होणार आहे. विशेष म्हणजे आता नव्या रुपातील माणिकचंद ऑक्सिरिचची कॉपी करणार्‍यांना कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.जे डब्ल्यू मेरीयट हॉटेल येथे आयोजित समारंभात ऑक्सिरिच चे देशभरातून आलेले वितरक ,फ्रेंच्यायसी तसेच नामवंत उद्योजक उपस्थित होते. (Manikchand Oxyrich Packaged Water)

माणिकचंद ऑक्सिरिचने नेहमीच ग्राहकांना गुणव्वतापुर्ण पाण्याचा पुरवठा करण्यावर भर दिला आहे.
त्यामुळे ग्राहकांनी आमच्यावर कायम विश्वास ठेवला असून त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे.
आता कंपनीने केलेला नविन बदल नक्किच ग्राहकांच्या पसंतीला पडले अशी खात्री आहे.

जान्हवी धारीवाल-बालन, अध्यक्षा, आरएमडी ग्रुप.
(Janhavi Dhariwal Balan, President, RMD Group)

Related Posts