IMPIMP

Pune Crime News | खोटे कागदपत्र तयार करुन जागा बळकावली, 8 कोटींची फसवणूक करणाऱ्या दोघांवर FIR; पर्वती परिसरातील घटना

by sachinsitapure
Cheating Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | कौटुंबिक संबंधातून करारनामा न करता वापरण्यास दिलेल्या जागेचे खोटे कागदपत्रे (Forged Documents) तयार करुन एका ज्येष्ठ नागरिकाची जागा बळकावून फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बापलेकांवर पर्वती पोलीस ठाण्यात (Pune Police ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) 2013 ते सप्टेंबर 2023 दरम्यान पर्वती येथील अरुणोदय सहकारी गृह संस्था येथे घडला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत संजय श्रीनिवास देशपांडे Sanjay Srinivas Deshpande (वय-65 सध्या रा. पर्वती, पुणे मुळ रा. अमेरिका-America) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाळासाहेब त्रिंबक चव्हाण (Balasaheb Trimbak Chavan), प्रकाश बाळासाहेब चव्हाण Prakash Balasaheb Chavan (दोघे रा. अरुणोदय सह-गृह संस्था मर्या. पर्वती, पुणे) यांच्यावर आयपीसी 420, 467, 471, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.(Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचे वडील एकमेकांच्या ओळखीचे होते. 1980 मध्ये आरोपी पुण्यात कामानिमित्त आल्यानंतर फिर्यादी यांच्या वडिलांनी कौटुंबिक संबंधामुळे आरोपींना बगल्यामधील गॅरेज राहण्यासाठी व वापरण्यासाठी दिले होते. ही जागा आरोपींना तात्पुरती वापरासाठी दिल्यामुळे फिर्यादी यांच्या वडिलांनी कोणताही करार केला नाही. आरोपींनी जागा बळकावण्याच्या उद्देशाने संगनमत करुन फिर्यादी यांच्या आईचा बनावट करारनामा तयार केला.

आरोपींनी फिर्यादी यांच्या आईने यापूर्वीच जागा विकल्याचे भासवून फिर्यादी यांचे बनावट संमती पत्र तयार करुन
मिळकत विकण्यास संमती असल्याचे भासवून मिळकतीचे खोटे दस्तऐवज तयार केले.
याबाबत फिर्यादी यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे.
आरोपींनी आईचे व फिर्यादी यांचे खोटे कागदपत्र तयार करुन फिर्यादी यांची 8 कोटी रुपयांची 6343 स्क्वेअर फूट
मिळकतीवर कब्जा करुन फिर्यादी यांची फसवणूक (Fraud) केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts