IMPIMP

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट, शवविच्छेदन अहवाल NIA कडे

by pranjalishirish
Mansukh Hiren Murder Case | encounter specialist pradeep sharma got job of killing mansukh hiren nia chargesheet

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)मनसुख हिरेन Mansukh Hiren मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापत आहे. या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागत आहे. त्यानंतर आता मनसुख हिरेन  Mansukh Hiren यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) प्राप्त झाला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. ही गाडी मनसुख हिरेन Mansukh Hiren  यांची असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातच काही दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल एनआयएला मिळाला आहे. यामध्ये हिरेन यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मनसुख हिरेन यांच्या फुफ्फुसामध्ये खाडीतील पाणी आढळले आहे.

दरम्यान, यापूर्वी शवविच्छेदन अहवालामध्ये धक्कादायक खुलासा झाला होता.
त्यामध्ये मनसुख यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीरच्या लाल रंगाच्या खुणा आहेत.
तसेच त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या नाकपुडीजवळ दीड सेटींमीटर बाय 1 सेंटीमीटरची लाल खूण
आढळल्याचेही शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.

‘ती’ कार मीच चालवली : सचिन वाझे

स्कॉर्पिओ गाडीनंतर एनआयएच्या पथकाने एक इनोव्हा गाडीही जप्त केली आहे.
ती इनोव्हा कार आपणच चालवत होतो, अशी कबुली सचिन वाझे यांनी चौकशीदरम्यान दिली आहे.

Also Read :

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय

भाजपचे संकटमोचक आमदार गिरीश महाजन यांना ‘कोरोना’ची लागण

भाजपचे नगरसेवक संजय भोपी यांचे ‘कोरोना’मुळे निधन

Related Posts