IMPIMP

Medical Education in Marathi | हिंदीपाठोपाठ आता वैदकीय शिक्षण मराठीतून

by nagesh
Medical Education in Marathi | medical education will now be in marathi language in maharashtra says girish mahajan

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – देशात मातृभाषेत उच्च शिक्षण देण्याचा भाजप (BJP) शासीत केंद्र सरकराचा संकल्प आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात
(Madhya Pradesh) प्रथम हिंदीतून (Hindi) वैदकीय शिक्षण (Medical Education in Marathi) देणे सुरु केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता
महाराष्ट्रात देखील वैदकीय शिक्षण प्रांतभाषा मराठीतून (Marathi) देण्याची सुविधा करण्यात येणार आहे. त्यासाठी मराठीतून वैदकीय अभ्यासक्रम
(Medical Education in Marathi) तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मध्य प्रदेशातील वैदकीय शिक्षण हिंदीतून देण्याचा निर्णय अलीकडचा असताना, आता महाराष्ट्रात मराठीतून वैदकीय शिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे. त्याबाबत माहिती वैदकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैदकीय शिक्षण घेणे सोपे होणार आहे. ही सुविधा 2023 च्या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात येणार आहे.

 

एमबीबीएस, फिजिओथेरपी , होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, आयुर्वेद यांसारखे अभ्यासक्रम 2023 पासून विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 2023 च्या शैक्षणिक वर्षांपासून हे अभ्यासक्रम मराठीतून (Medical Education in Marathi) उपलब्ध होतील, असे महाजन म्हणाले. यातील विशेष बाब म्हणजे मराठीतून वैदकीय शिक्षण घेणे बंधनकारक नसणार आहे. ते ऐच्छिक (Optional NOT Compulsory) असणार आहे.

 

यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रात देखील प्रांतभाषेत म्हणजेच मराठीत
वैद्यकीय शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असून, सर्वच प्रकारचे अभ्यासक्रम आणि एमबीबीएसचा अभ्यासक्रम
आम्ही मराठीत देणार आहोत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचा मोठा न्यूनगंड आहे.
त्यामुळे ते सहसा या क्षेत्रात येत नाहीत. पण ते दूर राहू नयेत म्हणून आमचा प्रयत्न आहे.
याबाबत समित्या नेमल्या गेल्या आहेत. पुढील शैक्षणिक वर्षांपासून (2023) हा निर्णय लागू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Medical Education in Marathi | medical education will now be in marathi language in maharashtra says girish mahajan

 

हे देखील वाचा :

Gujarat Election 2022 | निवडणूक आयोगाचा निर्णय ! गुजरातमध्ये विधानसभेपूर्वी 900 अधिकार्‍यांच्या बदल्या, जाणून घ्या कारण

Tata Airbus Project | काँग्रेसचा घणाघाती आरोप, शिंदे फडणवीस सरकार गुजरातचे एजंट! प्रकल्पांपाठोपाठ मुंबई सुद्धा त्यांना देऊन टाकतील

Narayan Rane | ‘पंचवीस पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो लावला’ – फेसबूक बहाद्दर

 

Related Posts