IMPIMP

Meena Deshmukh | दुर्देवी ! ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन

by nagesh
Meena Deshmukh | veteran lavani artist meena deshmukh death in pandharpur fortuner car accident

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : Meena Deshmukh | नुकतेच महामार्गावरील भीषण अपघातात ‘तुझ्यात जीव रंगला मालिकेतील’ कल्याणी कुरळे हिचा मृत्यू झाला होता. आता कल्याणीनंतर पुन्हा एकदा एकाला देखील अशाच अपघातात आपला जीव गमवावा लागला असून ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेने मीना देशमुख यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. (Meena Deshmukh)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख या रविवारी रात्री आपल्या फॉर्च्यून कारने मोडलिंबकडून पंढरपूर कडे जात होत्या. गाडीत त्यांच्यासोबत त्यांची मुलगी, नात आणि ड्रायव्हर होते. रात्रीची वेळ असल्याने अरुंद पुलावरून गाडी जात असताना ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने गाडी 50 फूट खोल कालव्यात पडली. कालवा इतका खोल होता की याची माहिती पटकन कोणालाही मिळाली नाही. माहिती मिळायला उशीर झाला. मात्र अपघाताची माहिती मिळताच बाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला सुरुवात केली. तर ॲम्बुलन्स बोलावून गावकऱ्यांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात पाठवले. मात्र मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला होता. (Meena Deshmukh)

 

कालव्यात उतरण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने गावातील लोकांनी जखमींना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. यामुळे जखमींना उपचार देण्यास उशीर झाला. तर मदत कार्य करण्यास देखील अनेक अडथळे निर्माण झाले होते. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी पंढरपूर-कुर्डुवाडी येथील रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Meena Deshmukh | veteran lavani artist meena deshmukh death in pandharpur fortuner car accident

 

हे देखील वाचा :

Gairee | ‘गैरी’ चित्रपटाचा ट्रेलर आउट; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Udayanraje Bhosale | ‘युगपुरुषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ – उदयनराजे भोसले

Sanjay Raut | राज्यपालांच्या पदमुक्त होण्याच्या चर्चेनंतर श्रेयासाठी शिवसेना सरसावली; संजय राऊत म्हणाले – ‘शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच…’

 

Related Posts