IMPIMP

Gairee | ‘गैरी’ चित्रपटाचा ट्रेलर आउट; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

by nagesh
Gairee | gairee marathi movie pure entertainment social awareness gairee visit on 16th december

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : Gairee | हिंदी बरोबरच मराठी मध्ये देखील विविध विषयांवर प्रकाश टाकणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशाच पद्धतीचा ‘गैरी’ हा सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला निखळ मनोरंजनातून आदिवासींच्या समस्या मांडणारा आणि विचार करायला लावणारा हा सिनेमा. याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरने चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच छाप टाकली आहे. (Gairee)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आदिवासी समाजातला एक तरुण डॉक्टर होऊ पाहत असतो त्याच्या या प्रवासात येणारे अडथळे, गोंधळ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे. तर या चित्रपटात अभिनेता मयूरेश पेम, नम्रता गायकवाड, प्रणव रावराणे, आनंद इंगळे, केतन पवार, समीर खांडेकर, सुनील देव, कृतिका गायकवाड आणि देविका दफ्तरदार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. (Gairee)

 

 

या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन पांडुरंग बाबुराव जाधव यांनी केले आहे. युक्ता प्रॉडक्शन्स आणि द्विजराज फिल्म्स यांची निर्मिती असलेला हा चित्रपट आहे. तर या चित्रपटाला गुरु ठाकूर आणि विष्णू थोरे यांनी गीतलेखन केले आहे. तर संगीत दिग्दर्शन अमित राज, मयुरेश केळकर यांनी केले आहे. तर नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केले. तर वैशाली सामंत, अमित राज, धुरा कुंभार, ऋषिकेश शेलार यांनी गाणी गायले आहेत. तर पाश्‍वसंगीत मयुरेश केळकर यांनी केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Gairee | gairee marathi movie pure entertainment social awareness gairee visit on 16th december

 

हे देखील वाचा :

Udayanraje Bhosale | ‘युगपुरुषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ – उदयनराजे भोसले

Sanjay Raut | राज्यपालांच्या पदमुक्त होण्याच्या चर्चेनंतर श्रेयासाठी शिवसेना सरसावली; संजय राऊत म्हणाले – ‘शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच…’

Rohit Shetty | रोहित शेट्टीच्या बहुचर्चित ‘सर्कस’चा टीझर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित

Molestation Case | विनयभंगाच्या कलमाखाली आरोपी महिलेला दोषी ठरविण्याचा न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

 

Related Posts