IMPIMP

Mega Recruitment Health Department | आरोग्य विभागाच्या मेगा भरतीला मुहूर्त सापडला; एसईबीसी प्रवर्गातील पदे ही खुल्या अथवा ईडब्ल्यूएसतुन भरण्याचा निर्णय

by omkar
Mega Recruitment Health Department

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन –  – ग्रामविकास विभागाने Rural Development Department सोमवारी काढलेल्या आदेशानुसार राज्यातील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागातील Mega Recruitment Health Department रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हि भरती करताना मराठा समाजासाठीच्या एसईबीसी SEBC प्रवर्गातील पदे ही खुल्या वा ईडब्ल्यूएस EWS प्रवर्गातून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Covid Update : 76 दिवसानंतर आढळल्या कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात 2726 रूग्णांचा झाला मृत्यू

जिल्हा परिषदांमधील आरोग्य पर्यवेक्षक, औषधी निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची पदे भरण्यासाठी मार्च २०१९ मध्ये मेगाभरतीची Mega Recruitment Health Department जाहिरात देण्यात आली होती.

त्यानंतर त्याची प्रक्रियाही सुरु झाली होती.
दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण Maratha Reservation रद्द केले.
या निकालाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने हा नवा आदेश काढला आहे.
त्यानुसार ज्या उमेदवारांनी सदर पदाकरिता अर्ज भरलेला आहे ते सर्व भरतीसाठी पात्र असतील.
एसईबीसी आरक्षण रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातून त्यांना संधी दिली जाईल.
एसईबीसी आरक्षणामधून ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे त्यांनी १ जुलै २०२१ ते २१ जुलै २०२१ दरम्यान त्यांना त्यांचा अर्ज खुल्या प्रवर्गात ठेवायचा आहे की,
आर्थिकदृष्ट्या मागास (ईडब्ल्यूएस) प्रवर्गात याचा पर्याय देणे आवश्यक राहील.
जे पर्याय देणार नाहीत ते खुल्या प्रवर्गात असल्याचे समजले जाईल.

१ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत उमेदवारांना लेखी परीक्षा ओळखपत्र ऑनलाइन दिले जाईल.
आरोग्य पर्यवेक्षक, औषधी निर्माण अधिकारी पदासाठी ७ ऑगस्ट २०२१ रोजी लेखी परीक्षा होईल.
आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी ८ ऑगस्ट २०२१ रोजी लेखी परीक्षा होईल.
तर ९ ऑगस्ट २०२१ ते २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती आदेश दिले जातील.

दरम्यान, २०१६च्या कायद्यानुसार दिव्यांगांसाठीचे आरक्षण ३ टक्क्यांवरून ४ टक्के झालेले असल्याने सुधारित जाहिरात ही २९ किंवा ३० जून रोजी काढण्यात येणार आहे.
दिव्यांगांना १ जुलै ते २१ जुलै २०२१ दरम्यान नव्याने समाविष्ट पदांसाठी ऑनलाइन अर्ज करता येतील.

Google | गुगलने सुरू केली फोटो हाईड करण्याची सुविधा, अशा प्रकारे लपवा पर्सनल फोटोज

Liquor sales | बार-रेस्टॉरंट आणि पार्ट्या बंद होऊनही वाढली दारूची विक्री, जाणून घ्या कारण

Five Police Officers Suspended | दोन पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस तडकाफडकी निलंबित; केली होती महाराष्ट्रातील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीर तपासणी

 Web Title : Mega recruitment in health department, sebc posts will be filled through open or ews

Related Posts